
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून श्रमदानाने तालुक्यातील ३७ गावांलगत असलेल्या ओढ्यांवर ६९ वनराई बंधारे बांधकाम करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी दीपक गरुड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या कृषी विभागाने रामपुरी व मंगसा येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग मिळवून येथील गावालगतच्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखडे, प्रीती गाढे, कृषी विस्तार अधिकारी दिनेश खोपे, तांत्रिक सहायक सूरज शेंडे, रोजगार सेवक सचिन डबले, प्रवीण धमदे, विजय राहाटे, मंगसा येथील ग्रामसेवक अरुण देशभ्रतार व रामपुरी येथील ग्रामसेवक दत्तहरी चरटे उपस्थित होते.
या गावांत होणार वनराई बंधारे
सिरोंजी, सर्रा, सोनपूर, मंगसा, महारकुंड, नागलवाडी, पाटणसावंगी, गडेगाव, टाकळी, बडेगाव, जलालखेडा, खुबाळा, बिछवा, चांपा, सावरमेंढा, इसापूर, सावंगी हेटी, तेलंगखेडी, पटकाखेडी, पंढरी, खरडुका, गडमी, गुमगाव, वाकोडी, केळवद, गोसेवाडी, मानेगाव, ब्रह्मपुरी, पिपळा नांदुरी, माळेगाव जोगा, जोधपूर, माळेगाव टाऊन, जोगा, खैरी ढालगाव, किरणापूर आदी गावांमध्ये एकूण ६९ वनराई बंधारे बांधले जात आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.