Potato Demand : चाकणच्या बटाट्याला उत्तर प्रदेशातून मागणी

चाकण बाजार समितीच्या आवारात दाखल झालेल्या या बटाट्याला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मागणी वाढली असून, विक्रीसाठी पाठविला जात आहे.
Potato Demand
Potato DemandAgrowon

चाकण, जि. पुणे ः उत्तर पुणे जिल्ह्यातील बटाट्याचे आगार समजल्या जाणाऱ्या सातगाव पठार, वाफगाव, खेड परिसरातील बटाट्याची काढणी (Potato Harvesting) सुरू झाली आहे. चाकण बाजार समितीच्या आवारात (Chakan APMC) दाखल झालेल्या या बटाट्याला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मागणी वाढली असून, विक्रीसाठी पाठविला जात आहे.

Potato Demand
Potato Cultivation : बटाटा लागवड करताना काय काळजी घ्याल?

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात या हंगामातील नवीन बटाट्याच्या हंगामाला प्रारंभ झाला. शनिवारी (ता.८) सुमारे बारा टन आवक झाली होती. यावेळी प्रति किलोला किमान २३ ते कमाल २८ रुपये भाव मिळाला. या बटाट्याला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मोठी मागणी असल्याने हा बटाटा परराज्यात विक्रीसाठी जात आहे.

Potato Demand
Potato Production: आसाममधील बटाटा उत्पादनात वाढ

खेड तालुक्यातील औदर येथील शेतकरी भीमाजी होजगे, पाईट येथील शेतकरी हिरामण काळे, बाळासाहेब बधाले आदींनी बटाटा विक्रीसाठी बाजारात आणला होता. लाल मातीतील हा बटाटा असल्याने याला चांगला उठाव असून, दरही चांगला मिळतो. याबाबत शेतकरी भीमाजी होजगे, बाळासाहेब बधाले यांनी सांगितले, की नवीन बटाट्याला मोठी मागणी असल्याने भाव चांगला मिळत आहे..

त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत आहे. असेच भाव टिकून राहिले पाहिजे तसेच वाढले पाहिजेत. पावसाने या वर्षी मात्र बटाट्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बटाटा सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापारी बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले, की येथील महात्मा फुले बाजारात पावसाळी हंगामात डोंगराळ भागातील नवीन बटाटा विक्रीस येतो.

या बटाट्याला परराज्यात विशेषतः उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे या बटाट्याला भावही चांगले मिळतात. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरासरी उत्पादन खर्च निघेल. शेतकऱ्यांनी बटाटा विक्रीसाठी आणताना तो व्यवस्थित प्रतवारी करून आणावा त्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा होतो व घेणाऱ्याला माल चांगला मिळतो.

उत्तर प्रदेशातून लाल मातीच्या बटाट्याची मागणी

उत्तर प्रदेशातील व्यापारी जावेद भाई, पप्पू भाई कुरेशी यांनी सांगितले, की चाकण येथील नवीन बटाट्याला मोठी मागणी उत्तर प्रदेशातून असते. यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात बटाटा खरेदी करतो. या बटाट्याची उत्तर प्रदेशात ‘चाकण बटाटा’ म्हणून विक्री होते.

या ठिकाणांवरून मागणी

चाकणच्या बटाट्याला बनारस, लखनौ, बरेली, झांसी, पिलीभीत, बरेली येथून मागणी आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, व्यापारी जमीरभाई काझी यांनी दिली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com