
नागपूर ः जगात आजच्या घडीला शेतमालाची उत्पादकता (Agriculture Productivity) हा गंभीर प्रश्न नसून अन्नधान्याची नासाडी (Food Wastage) रोखण्याचे मोठे आव्हान आहे. परिणामी सेंद्रिय शेतीपद्धतीत (Organic Farming) शेतमालाची उत्पादकता कमी होते किंवा अशा शेतमालाला कमी दर मिळतो, असे सांगत या शेतीपद्धतीला विरोध करणे संयुक्तिक नसल्याची माहिती मूळच्या फ्रान्स येथील रहिवासी इकोसर्टच्या भारतीय समन्वयक रोझेन रिचर्ड यांनी दिली.
रोझेन म्हणाली, वाढता ताणतणाव तसेच विषांशयुक्त अन्न, फास्टफूड संस्कृतीचा अंगीकार या कारणांमुळे मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. परिणामी सेंद्रिय किंवा रेसीड्यू फ्री शेतमालाला जागतिकस्तरावर मागणी वाढली आहे. परंतु असा शेतमाल प्रमाणित केला जात नाही.
त्यामुळे सहज बाजारपेठ मिळविणे शक्य होत नाही किंवा अशा शेतमालाला दर कमी मिळतो. त्याच कारणामुळे असा शेतमाल प्रमाणीकरण करण्यावर भर दिल्यास ग्राहकांमध्ये देखील विश्वासार्हता वाढविणे शक्य होणार आहे. भारतात सध्या २६ प्रमाणीकरण संस्था आहेत. फ्रान्स मुख्यालय असलेल्या ‘इकोसर्ट’चे प्रमाणीकरणासाठी सध्या १६५ देशात काम होत आहे.
त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतीय शेतीपद्धतीत तणनाशकांचा वापर नजीकच्या काळात वाढला आहे. त्याचे दूरगामी परिणामी शेतीपद्धतीवर होतील. त्यामुळे ग्लायफोसेटसारख्या तणनियंत्रकांच्या वापराबाबत विचार झाला पाहिजे. जमिनीची टणकता वाढणे, पाण्याचे प्रदूषणात होणारी वाढ, अशा समस्या तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवतील, परिणामी त्याबाबतही विचार झाला पाहिजे.
भारतात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु जगाच्या तुलनेत सेंद्रिय प्रमाणित शेतीखालील क्षेत्र मात्र कमी आहे. प्रमाणीकरण वाढविल्यास जागतिक किंवा स्थानिकस्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. त्याकरिता प्रयत्न होण्याची गरज आहे.
- रोझेन रिचर्ड, इकोसर्ट, समन्वयक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.