Ethanol Production : इथेनॉल उत्पादन, साठवणुकीचे आव्हान

२०३० पर्यंत ११२४ कोटी लिटर इथेनॉलची गरज; अभ्यासकांचा निष्कर्ष
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : केंद्राने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याकरिता २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत ११२४ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. सध्याच्या प्रकल्प क्षमता पाहता २०३० पर्यंत नव्या प्रकल्पांची उभारणी करणे व त्याची साठवणूक करणे हे एक मोठे आव्हान असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉल प्रकल्पांची संख्या १४० च्या पुढे जाणार

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मिझोराम, आयझॉलमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने २०३० मध्ये पेट्रोलची मागणी आणि इथेनॉलच्या पुरवठ्याबाबत अंदाज घेण्यासाठी सांख्यिकीय पद्धती वापरल्या आहेत. त्यांच्या अभ्यासात विविध रेखीय आणि नॉन-रेखीय मॉडेल वापरले गेले. १९९७ ते २०२१ पर्यंतचा पेट्रोल वापर डेटा या मॉडेल्सचा विकास आणि मूल्यमापन करण्यासाठी वापरला गेला. यानुसार पेट्रोलची २०३० पर्यंतची मागणी ५६२३६ कोटी लिटर इतकी असू शकते. २० टक्के इथेनॉल मिश्रण गृहीत धरले, तर ११२४ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासू शकते, असा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून केंद्राने इथेनॉल निर्मितीसाठी साखर उद्योगाबरोबर अन्य धान्य उद्योगांनाही मोठे प्रोत्साहन दिले आहे. यापूर्वी कधीही इथेनॉलचे उत्पादन न घेणाऱ्या कारखान्यांनीही गेल्या दोन वर्षांपासून इथेनॉल उत्पादनास सुरुवात केली. यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे लक्ष काही राज्यांमध्ये ९ ते १० टक्क्यांपर्यंत गेले आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे इथेनॉलचे उत्पादन काही प्रमाणात वाढू शकेल पण इथेनॉलचा साठा करण्यासाठी तेल कंपन्यांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. निर्माण झालेले इथेनॉल साठवणूक करणे हे यापुढील काळात आव्हानात्मक असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. दोन वर्षांपासून इथेनॉलच्या निर्मितीत वाढ झाली असली तरी टँकर्स वेळेत मोकळे न होणे, तेल कंपन्याकडे इथेनॉल साठवणुकीसाठी जागा नसणे आदी बाबीमुळे अनेक इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने इथेनॉल साठवणुकीलाही जादा महत्त्व देण्याची गरज निर्माण झाली आहे.


Ethanol Production
Ethanol Production : साखरेपासून इथेनॉल निर्मितीत घ्या पुढाकार

इथेनॉलच्या उत्पादनास प्राधान्य देण्याची गरज
साखर कारखान्यांनी साखरेपेक्षा इथेनॉलच्या उत्पादनास प्राधान्य देण्याची गरज आहे. केंद्राने ही गरज ओळखून आणखी जादाचा खरेदी दर देऊन इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असे झाले तरच इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढू शकेल. या व्यवसायातून अनेक उद्योगांना आत्मविश्वास व आर्थिक स्थैर्य मिळू शकेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com