Chana Cultivation : खामगाव तालुक्यात हरभरा लागवड वाढणार

या रब्बी हंगामात ३३ हजार १० हेक्‍टरवर रब्‍बी पिकांची पेरणी केली जाणार आहे. मागील हंगामात ३० हजार ९८६ हेक्‍टरवर प्रत्‍यक्ष पेरणी झाली होती.
Chana Cultivation
Chana CultivationAgrowon

खामगाव, जि. बुलडाणा ः या रब्बी हंगामात ३३ हजार १० हेक्‍टरवर रब्‍बी पिकांची (Rabbi Crops) पेरणी केली जाणार आहे. मागील हंगामात ३० हजार ९८६ हेक्‍टरवर प्रत्‍यक्ष पेरणी झाली होती. यावेळी हरभऱ्याची पेरणी (Chana Cultivation) अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chana Cultivation
Chana Cultivation : हरभरा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

यंदा चांगला पाऊस झाल्‍याने अनेक शेतकऱ्यांच्‍या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी तालुक्यातील बहुतांश शेतकरी रब्‍बी पिकाच्या तयारीला लागला आहे. शेतीच्‍या मशागतीची कामे सुरु आहेत. सध्या जमिनीत ओलावा आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना रब्‍बी लागवडीसाठी होणार आहे. सध्या सोयाबीनची काढणी सुरु असल्याने रब्बी पेरण्यांना आवश्‍यक तितका वेग आलेला नाही. येत्‍या काही दिवसांत शेतकरी पेरणीला सुरुवात करतील. तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध आहे. त्‍याचबरोबर विहिरींच्या पातळीतही मोठी वाढ झाली असल्याने रब्बीसाठी चिंता मिटलेली आहे. तालुक्यात प्रामुख्याने हरभऱ्याची लागवड १६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होईल, असे गृहीत धरत नियोजन करण्यात आले आहे.

Chana Cultivation
Chana Cultivation : बुलडाण्यात हरभरा लागवड होणार दोन लाख हेक्टरवर

रब्बीतील नियोजित पेरणी अशी

पीक नियोजित क्षेत्र (हेक्टर)

गहू ३५००

ज्‍वारी १५०

हरभरा १६२००

मका १२००

करडई २०

कांदा ३४००

भाजीपाला १०४०

इतर पिके १५००

एकूण ३३०१०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com