Chana Farming : सिंदगी येथे हरभरा शेती दिन साजरा

कृषी विज्ञान केंद्रातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत समूह प्रथम पंक्ती पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम रब्बी २०२२ अंतर्गत सिंदगी (ता. कळमनुरी ) येथे हरभरा शेती दिन साजरा करण्यात आला.
Chana Farming
Chana Farming Agrowon

Chana Farming Day हिंगोली ः जिल्ह्यातील तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (Food Security MIssion) अंतर्गत समूह प्रथम पंक्ती पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम रब्बी २०२२ अंतर्गत सिंदगी (ता. कळमनुरी ) येथे हरभरा शेती दिन (Chana Farming Day) साजरा करण्यात आला.

Chana Farming
Chana Market : नव्या हरभऱ्याची बाजारातील आवक वाढतेय

अध्यक्षस्थानी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजी माने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, राजेश भालेराव, अनिल ओळंबे, कृषी विस्तार विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, शामराव मगर, तात्याराव मगर, गुलाबराव सूर्यवंशी, दत्तराव मगर, प्रभाकर मगर, दौलतराव मगर, ज्ञानेश्वर मगर, प्रवीण थोरात, वंदना थोरात आदी उपस्थित होते.

Chana Farming
Chana Sowing : सोलापूरमध्ये हरभरा क्षेत्रात मोठी वाढ

माने म्हणाले, की सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीक फेरपालट करावा. काटेकोर पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.

उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करावेत. डॉ. शेळके म्हणाले, की शेतकऱ्यांनी गावात कृषी विज्ञान मंडळांची स्थापना करावी.

भालेराव म्हणाले, की कळमनुरी तालुक्यातील सिंदगी आणि तोंडापूर या गावातील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांची निवड करून त्यांना हरभऱ्याचे नवीन वाण फुले विक्रम व एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राद्वारे देण्यात आले.

ओळंबे म्हणाले, की हळदीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व आहे. डॉ. मुराई म्हणाले, की हरभऱ्याचा फुले विक्रम हा वाण कम्बाईन हार्वेस्टरने काढण्यासाठी सुलभ आहे. सिंदगी, तोंडापूर, कवडा येथील शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com