Chana Sowing : हरभरा पेरा सरासरीजवळ

कांद्याच्या लागवडी जोमात सुरू आहेत. मात्र कृषी विभागाने कांदा लागवडीची माहिती संकलित करणेच बंद केल्याने नेमकी किती पेरणी झाली, हे कळायला तयार नाही.
Sowing Gram
Sowing GramAgrowon

नगर ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) ७४.१७ टक्के झाली आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी (Chana Sowing) सरासरीच्या जवळ गेली आहे. गहू (Wheat), मक्याच्या (Maize) पेरणीने सरासरी ओलांडली आहे.

कांद्याच्या लागवडी जोमात सुरू आहेत. मात्र कृषी विभागाने कांदा लागवडीची (Onion Cultivation) माहिती संकलित करणेच बंद केल्याने नेमकी किती पेरणी झाली, हे कळायला तयार नाही.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी ५ लाख ५३ हजार ३२८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा ४ लाख १० हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

हरभऱ्याचे ८८ हजार ३७६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत ८८ हजार ११७ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ९९.७१ टक्के पेरणी झाली आहे. गव्हाचे ८६४०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

त्या तुलनेत ९२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १०६ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे १४ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, १८ हजार ९११ हेक्टरवर मका पेरल्याने १३३ टक्के पेरणी झाली आहे.

ज्वारीचे क्षेत्र यंदाही घटले. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ९४४ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरीच्या तुलनेत यंदा ५२.२५ टक्के पेरणी झाली आहे.

सूर्यफूल, जवस, तिळाची पेरणी नेहमीप्रमाणे कमीच आहे. जवसाची ४ हेक्टरवर, तिळाची १२ हेक्टरवर, सूर्यफुलाची ७ हेक्टरवर, तर इतर तेलबियांची २७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Sowing Gram
Rabbi Jowar Area : रब्बी ज्वारीचे क्षेत्र यंदा ८० हजार हेक्टरने घटले

कांदा लागवडीकडे कल

रब्बी पेरणीच्या काळात परतीचा जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे पेरणीला उशीर झाल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र घटल्याचे सांगितले जात आहे. त्या जागी कांदा लागवड होत आहे.

मात्र कृषी विभागाने यंदा कांदा लागवडीची नोंद ठेवणे बंद केल्याने कांद्याची जिल्ह्यात नेमकी किती लागवड झाली, याची माहिती कळायला तयार नाही. कृषी विभागाकडेही ही माहिती नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com