Rain Update : मध्य महाराष्ट्र, कोकणात विजांसह पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी परतीच्या पावसाचा तडाखा सुरू आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात (Kokan Madhy Maharshtra Rainfall) तुरळक ठिकाणी परतीच्या पावसाचा (Heavy Rainfall) तडाखा सुरू आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

Rain Update
Rain Update : परतीचा माॅन्सून कुठे अडकला?

उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

बुधवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. आज (ता. २०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

देशाच्या बहुतांश भागांतून मॉन्सून परतणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात शनिवारी (ता. १५) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे. आज (ता. २०) चोवीस तासांत संपूर्ण, पश्चिम बंगाल, संपूर्ण ईशान्य भारत, तसेच छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंडच्या आणखी काही भाग, ओडिशाच्या काही भागासह बहुतांश भारतातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.

पुणे ः आज (ता.२०) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com