Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या मदतीतून चांदुररेल्वे मंडल वगळले

शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या मदतीतून चांदुररेल्वे मंडल वगळल्या गेल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. तर त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

जि. अमरावती : गेल्या ४ महिन्यांपासून तालुक्यात सुरूच आहे, त्यामुळे हाती येणारा घास ही पावसामुळे जाण्याच्या स्थितीत असताना शासनाने जाहीर (Government Aid) केलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rainfall) मदतीतून चांदुररेल्वे मंडल (Chandur Railway Mandal) वगळल्या गेल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. तर त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.

Wet Drought
Soybean Crop Damage : ‘हाती येता येता झाली सोयाबीनची माती’

ओला दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली. त्यात ३ हेक्टरपर्यंत मर्यादा घोषित केली, त्यानुसार प्रत्येक तालुक्याला मदतही पोहोचली. इतर मंडलातून शेतकऱ्यांच्या याद्या मागविण्याचेही काम शासनाकडून सुरू करण्यात आले. परंतु या मदतीतून चांदुररेल्वे भाग एक व दोन हे मंडल वगळण्यात आले असल्याने त्या मदतीचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार नसल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

मतदार संघातील तीनही तालुक्यांत पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना नांदगाव तालुक्यातील चार मंडल, धामणगाव तालुक्यातील २ मंडले आणि चांदुर रेल्वेतील एक मंडल निकषातून सोडण्यात आले आहे. ही क्रूर थट्टा असून याला शासन व प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.

सप्टेंबरपर्यंतचा अहवाल पाठविला होता. त्याची मदत तालुक्याला प्राप्त झाली आहे. त्यात चांदूरची यादी जायची होती. अतिवृष्टीची मदत मिळत नसली तरी सततच्या पावसामुळे झालेले नुकसान या निकषात लवकरच चांदुररेल्वे मंडलाला ही मदत येणार आहे.

- राजेंद्र इंगळे, तहसीलदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com