पणन संचालकाच्या आदेशाने अनेकांची गोची

चंद्रपूर : बाजार समित्यांवरील अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य होण्याच्या निकषात बदल करण्यात आला आहे.
APMC
APMC Agrowon

चंद्रपूर : बाजार समित्यांवरील (Maharashtra APMC) अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य होण्याच्या निकषात बदल करण्यात आला आहे. पणन संचालकाचे (Marketing Director) यासंदर्भातील आदेश जिल्हा उपनिबंधकाकडे धडकल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुकांची चांगलीच अडचण झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांची मुदत संपली; मात्र निवडणुका न झाल्याने सध्या प्रशासक राज्य सुरू आहे. त्यामुळे अशासकीय प्रशासक मंडळाच्या सदस्यांचे पात्र व अपात्र यासाठीचे कोणतेच निकष राहणार याकडे संबंधितांचे लक्ष लागले होते. दरम्यान पणन संचालक सुनील पवार यांनी या निकषांबाबत आदेश जाहीर केले आहेत.

APMC
APMC : बाजार समित्यांवर सगळ्याचं नेत्यांचा डोळा ?

त्यानुसार संबंधित व्यक्तीवर ज्या अपराधासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त मुदतीची शिक्षा आहे, असा गुन्हा दाखल झालेला नसावा आणि अशा गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोषी ठरविलेले नसावे याबाबत स्थानिक पोलिस ठाण्याचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्या व्यक्तीकडून संबंधित बाजार समितीस कोणतेही येणे नसावे. ज्यामध्ये फी आकार अथवा इतर रकमेचा समावेश असून बाजार समितीचा दाखला आवश्यक राहील, अशा नवीन तरतुदी या आदेशात करण्यात आल्या आहेत.

APMC
APMC Ranking : ‘रॅंकिंग’मध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर नाही

संबंधित व्यक्ती कोणत्याही बाजार समिती किंवा शासनाचा किंवा स्थानिक प्राधानिक करण्याचा कर्मचारी नसावा. त्याने बाजार समितीचे व्यापारी, अडत्या, हमाल किंवा तोलारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही अनुज्ञप्ती (परवाना) धारण केलेली नसावी. संबंधित बाजार समितीत कोणत्याही माल विक्रेत्याला किंवा अडत्याला रक्कम प्रदान करण्यात कसूर केलेली नसावी, असे घडल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना सदस्य पदापासून बाद केले जाणार आहे.

पात्र-अपात्रतेसाठीचे निकष

बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर नियुक्त करावयाच्या व्यक्तीच्या पात्र अपात्रतेबाबतच्या प्रस्तावाबाबत काही निकषांची तपासणी करून अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये व्यक्तीचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, संबंधित व्यक्ती बाजार समिती क्षेत्रात राहत असणारी व शेतकरी असावी, सक्षम अधिकाऱ्याचा रहिवासी दाखला आणि शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा दाखल करावा लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com