Politics : ...तर नंदुरबार ‘जि.प.’मध्ये सत्तांतर शक्य

नंदुरबार : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्याने अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी १७ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन केले आहे.
Nandurbar Shinde
Nandurbar Shinde Agrowon

नंदुरबार : जिल्हा परिषदेचे (Nandurbar ZP) अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्याने अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी १७ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. या अडीच वर्षाचा कार्यकालासाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता ‘जैसे थे’ राहू शकते अथवा राज्यातील सत्तेतील सध्याचा पॅटर्न जर जिल्ह्यात लागू झाला. वरिष्ठांकडून तसे आदेश आले तर जिल्हा परिषदेत भाजप- शिवसेना (शिंदे गट) युतीचा सत्ता येऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या पदाधिकारी निवडणुकीत काहीही होऊ शकते.

Nandurbar Shinde
Agriculture Department : गुणनियंत्रण चौकशीसाठी नेमलेली समिती वादात

जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जुलै महिन्यातच संपला आहे. आरक्षणाचा मुद्द्यावरून तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाली होती. मात्र सध्या आरक्षण जाहीर झाले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जैसे थे निघाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होताच राजकीय गोटातही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. ॲड. सीमा वळवी अध्यक्ष काँग्रेसचे, तर उपाध्यक्ष शिवसेनेचे ॲड. राम रघुवंशी आहेत. ही आघाडी अडीच वर्षांपूर्वीचा राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न होता.

Nandurbar Shinde
Soybean Research : सोयाबीन उगवणक्षमतेचे होणार संशोधनात्मक प्रयोग

स्थानिक राजकारणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपशी राजकीय संघर्ष आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेते ॲड. के. सी. पाडवी यांच्याशी बेबनाव असतानाही ‘काँग्रेस’शी आघाडी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे अध्यक्षपद व शिवसेनेकडे उपाध्यक्षपद होते.

राज्यात शिवसेनेचे दोन गट झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे युती सरकार सत्तेत आहे. तोच पॅटर्न राबविला तर जिल्हा परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील नेत्यांना तसे आदेश देऊ शकतात. कारण नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यांनी प्रत्येक निवडणूक शिंदे गट शिवसेना व भाजप यांची युतीने लढविली जाईल. मुळे तसे आदेशाची शक्यता आहे.

...अशी गरज आहे संख्याबळाची

आदेश आल्यास भाजपचे २० व शिवसेनेचे ८ असे २८ सदस्य आहेत. कॉग्रेसचे २४ व राष्ट्रवादीचे ४ असे २८ सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी २९ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे एक सदस्याची जुळवा जुळव करणे भाजपला सहज शक्य आहे. फोडाफोडीचे राजकारण झाल्यास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गटाची सत्ता स्थापन होऊ शकेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com