
Soil Health Card Scheme : पिकांचे अपेक्षित उत्पादन (Crop Production) येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात.
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते. जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा (Soil Fertility) एक भाग आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य समजण्यासाठी भारत सरकारने मृदा आरोग्य कार्ड ही योजना सुरु केली. सन २०१५ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेत शेतजमिनीतील मातीची तपासणी (Soil Testing) करून त्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करून त्यानुसार पिकांचे उत्पादन घेण्याची शिफारस केली जाते.
जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले पीक मिळू शकेल. मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card ) योजना म्हणजे काय? मृदा आरोग्य कार्ड ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज कसा करावा याविषयीची माहिती पाहुया.
१९ फेब्रुवारी २०१५ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरतगड मृदा आरोग्य योजनेला सुरुवात झाली.
देशातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यासाठी राज्य सरकार कडून मदत केली जाते. या कार्डमध्ये मातीचे आरोग्य, मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये व इतर बाबींची माहिती असते.
केंद्र सरकारकडून दर तीन वर्षांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाते. शेतातील मातीच्या गुणवत्तेच्या आधारे हे कार्ड मिळते.
जे तीन वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाते. तीन वर्षांत देशातील सुमारे १४ कोटी शेतकऱ्यांना हे कार्ड देण्याचे उद्दिष्ट आहे. हे एक प्रकारचे रिपोर्ट कार्ड आहे ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असेल.
मृदा आरोग्य कार्ड
सर्वप्रथम, शेतातील मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात.
प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून मातीची तपासणी करून मातीची सर्व माहिती घेतली जाते.
तपासणीनंतर मातीच्या नमुन्याची उपलब्ध अन्नद्रव्ये आणि उपलब्ध नसणाऱ्या अन्नद्रव्यांची थोडक्यात बलस्थाने व कमकुवतता यांची यादी तयार केली जाते.
मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता जाणून घेऊन सुधारणेसाठी सूचनांसह त्याची यादीही तयार केली जाते.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या कार्डमध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या नावाचा अहवाल एक-एक करून ऑनलाइन अपलोड केला जातो.
शेतकऱ्याच्या मोबाईलवरही याची माहिती मिळू शकते.
मृदा आरोग्य कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, अर्जदाराला https://soilhealth.dac.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
अशाप्रकारे मुखपृष्ठ तुमच्यासमोर उघडेल.
यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. ज्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करावं लागेल.
राज्य सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
येथे तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
या फॉर्ममध्ये युजर ऑर्गनायझेशन डिटेल्स, भाषा, युजर डिटेल्स, युजर लॉगिन अकाऊंट डिटेल्स इत्यादी भरावे लागतील.
सर्व माहिती नीट भरल्यानंतर ती सबमिट करावी, नोंदणी यशस्वी झाल्यानंतर लॉगिन करून होम पेजवर लॉगिन फॉर्म ओपन करावा लागेल.
अशा प्रकारे, आपल्या शेताचे मृदा आरोग्य कार् मिळू शकेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.