Jaljeevan Mission : रत्नागिरीत ८४६ ग्रामपंचायतींना रासायनिक किट वितरित

गावस्तरावर रासायनिक ‘फिल्ड टेस्ट किट’ च्या साहाय्याने जलसुरक्षक व महसूल गावनिहाय निवडण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

रत्नागिरी ः ‘जलजीवन मिशन’ (Jaljeevan Mission) कार्यक्रम मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना (Grampanchyat) रसायनिक किट वितरित करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘जलजीवन मिशन’ अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नलसे जल’प्रमाणे प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावर रासायनिक ‘फिल्ड टेस्ट किट’ च्या साहाय्याने जलसुरक्षक व महसूल गावनिहाय निवडण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार आहे.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या गावस्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या सदराखाली तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, पाणी व स्वच्छता विभागातील गट संसाधन केंद्रातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’ योजनेत नाशिक जिल्हा पिछाडीवर

त्या अनुषंगाने त्यांनी तालुकास्तरावरील सर्व जलसुरक्षक व महसूल गावनिहाय पाच महिला प्रतिनिधींना कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिने प्राथमिक आरोग्य केंद्र, गट व समूह स्तरावर प्रशिक्षणांचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानंतर प्रशिक्षण पार पडल्यानंतर संबंधित जलसुरक्षक व पाच महिलांनी महसूल गावनिहाय शाळा व अंगणवाडी, शासकीय इमारती व कुटुंबस्तरावरील वितरण बिंदूंपासून पाण्याची तपासणी करून त्याची नोंद ‘डब्लूक्यूएमआयएस’ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करणे अपेक्षित आहे.

पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा अयोग्य हे या रासायनिक ‘फिल्ड टेस्ट किट’द्वारे गावाला कळण्यास मदत होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com