छत्रपती कारखान्याचे ऊस धोरण जाहीर

ऊसतोडणी मजुरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालले. त्यामुळे केन हार्वेस्टरने मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करण्यासाठी जास्तीत जास्त ऊस क्षेत्राची लागवड पाच फूट पट्टा पद्धतीने करावी.
छत्रपती कारखान्याचे ऊस धोरण जाहीर
Chatrapati Sugar FactoryAgrowon

पुणे : ‘‘भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने लागण ‘हंगाम २०२२-२३’ करिता ऊस लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कारखान्याचे संचालक मंडळाचे नुकत्याच झालेल्या बैठकीत पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र व मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागवड धोरण निश्‍चित केले आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केली.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सुचविलेल्या ऊस जातीव्यतिरिक्त इतर कोणत्याही ऊस जातीची सभासदांनी लागवड करू नये. इतर ऊस जातीची लागवड केल्यास त्याची नोंदणी, तोडणी व गाळपाची जबाबदारी कारखान्याची राहणार नाही. ऊसतोडणी मजुरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालले. त्यामुळे केन हार्वेस्टरने मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करण्यासाठी जास्तीत जास्त ऊस क्षेत्राची लागवड पाच फूट पट्टा पद्धतीने करावी. ऊस लागण धोरणानुसार जादा रिकव्हरी असलेल्या व्हरायटीच्या उसाची लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले.

गतवर्षी १५ जून ते ३१ मार्च असा ऊस लागवडीचा कार्यक्रम होता. ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली होती. या धोरणात बदल करण्यात येऊन या वर्षी १ जुलै २०२२ पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली. ३१ मार्च २०२३ पर्यंत सभासदांना ऊस लागवड करता येईल.

या वर्षीचे ऊस लागवड धोरणानुसार ‘कोएम- २६५’ या ऊस जातीची १ जुलै ते २१ ऑगस्टपर्यंत ऊस लागवड करता येईल. १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘को ८६०३२’ या ऊस जातीची; तसेच १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत ‘कोसी -८६०३२,’ ‘कोव्हीएसआय ८००५’ व ‘एमएस १०००१’ या ऊस जातींची त्याचप्रमाणे ‘२०२२-२३’ चा गळीत हंगाम चालू झाल्यापासून ते हंगाम संपेपर्यंत वरील सर्व जातीचे खोडवे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उसाच्या क्रमवारीनुसार तोडणी :

कारखान्याचे कार्यक्षेत्रात खोडवा पिकाचे प्रमाण वाढावे, पर्यायाने रिकव्हरीमध्ये वाढ होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना व्हावा, या उद्देशाने हंगाम २०२२-२३ मध्ये खोडव्याची १५ डिसेंबरपासून २० टक्क्यांप्रमाणे तोड करण्यात येईल. त्यामध्ये ‘कोसी ८६०३२,’ ‘एमएस १०००१,’ ‘व्हीएसआय ८००५’ व ‘कोएम-२६५’ या ऊस जातीच्या खोडव्याची क्रमवारीनुसार तोडणी करण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com