Maharashtra Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार राज्याचा दौरा

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान (Crop Damage) झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यात दौरा सुरू करणार आहेत
CM Maharashtra
CM Maharashtra Agrowon

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान (Crop Damage) झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यात दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात शनिवारपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातून करणार आहेत.

CM Maharashtra
Marigold Producers : दर कोसळल्याने झेंडू उत्पादकांना फटका

दिवाळी निमित्त पत्रकार परिषेदत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्याबद्दल माहिती दिली. राज्यात येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आयोजित केल्याचे बोलले जात आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरा करत असल्याच्याही चर्चा आहेत.

उद्धव ठाकरेंचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर आज शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांचा दौरा निघणार आहे.

दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कुणाच्या दौऱ्याला किती प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपालिका, नगरपंचायती आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. त्यांचा कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालावर शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व अवलंबून असेल.

नेमकी खरी शिवसेना कोणाची अन्‌ जनाधार कोणाकडे आहे हे स्पष्ट होईल. त्यात महाविकास आघाडी होईल की नाही हे अस्पष्ट आहे.

दरम्यान, केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन या निवडणुका लढेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर विजय मिळविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com