Eknath Shinde : मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपशी हातमिळवणी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता.७) अखेर सहाव्या मजल्यावरील दालनात प्रवेश केला.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना आव्हान देत भाजपशी हातमिळवणी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी (ता.७) अखेर सहाव्या मजल्यावरील दालनात प्रवेश केला.

शिंदे यांच्या कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे सकाळी ११ च्या दरम्यान मंत्रालयात दाखल झाले. या वेळी आमदार दीपक केसरकर यांच्यासह समर्थक आमदारांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात दाखल झाले. या वेळी फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Eknath Shinde
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. या वेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com