Maharashtra Assembly Session : नागपूरच्या भूखंड वाटपप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विरोधकांची मागणी; विधानपरिषदेचे कामकाज स्थगित
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

नागपूर : नागपूरमधील भूखंड वाटपप्रकरणी (Nagpur Land Alocation) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी न्याय प्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीवर विरोधकांनी विधान परिषदेत चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे गोंधळातच विधान परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. (Maharashtra Assembly Session)

Eknath Shinde
Maharashtra Assembly Session : अडीच महिन्यांचा प्रशंसक दिसला विधान भवन परिसरात

नागपूर सुधार प्रन्यास मधील ८३ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या दोन कोटी रुपयांना बिल्डरला वाटल्याबद्दल न्यायालयाने न्याय प्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवला आहे. ही बाब गंभीर असून ती पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे सभागृहात मांडली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

Eknath Shinde
Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनात शेतकरी मुद्द्यांवर गदारोळाची शक्यता

दानवे यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज गोंधळातच सुरू झाले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद सदस्यांना शांततेचे आव्हान केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर कायम असलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज उद्या (ता.२०) पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

न्यायालयाकडून स्थगिती

नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी भूखंड ताब्यात देण्यात आले होते. ते १६ जणांना भाडेतत्त्वावर दिले असल्याचे निर्दशनास आले. हे भूखंड तत्कालीन नगरविकास मंत्र्यांच्या आदेशानुसार वाटप केल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने तत्कालीन नगर विकास मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला न्याय प्रशासनातील हस्तक्षेप असल्याचे म्हणत न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com