मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (ता. ८) औरंगाबाद येथे येत आहेत. स्थानिक मराठवाडा संस्कृती मंडळाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा
Udhhav ThackerayAgrowon

औरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) बुधवारी (ता. ८) औरंगाबाद येथे येत आहेत. स्थानिक मराठवाडा संस्कृती मंडळाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. (Shivsena Sabha)

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या संभाजीनगर शिवसेना शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ही जाहीर सभा होऊ घातली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच मैदानावर घेतलेल्या सभेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होत असलेल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यसभा व विधान परिषद निवडणूक निमित्ताने राज्यातील गतिमान राजकीय घडामोडी, तापलेले राजकारण सोबतच औरंगाबादच्या पाणी प्रश्‍नासह इतर मुद्द्यांवरून होत असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता बुधवारच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com