Shinde-Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयातील ‘उघडे दरवाजे बंद’

शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री दालनाचे सताड उघडे असलेले दरवाजे आता ठरावीक काळापुरतेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Shinde $ Fadanvis
Shinde $ FadanvisAgrowon

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री (CM) दालनाचे सताड उघडे असलेले दरवाजे आता ठरावीक काळापुरतेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आता दुपारी २ ते ४ पर्यंत भेटण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सत्तांतरानंतर नागरिकांच्या गराड्यात राहणारे मुख्यमंत्री असा प्रचार केला जात होता. मुख्यमंत्री मंत्रालयात भेटत असल्याने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर प्रचंड गर्दी होत होती. ही गर्दी रोखताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध आणले आहेत.

मंत्रालयात मुख्यमंत्री भेटत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात सहाव्या मजल्यावर येत होते. त्यामुळे एकच गोंधळ उडत होता. बुधवारी (ता.२) मंत्रिमंडळ बैठकीदिवशी सर्व मंत्री मंत्रालयात येत असल्याने त्यांना भेटण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.

दुपारी दोन नंतर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशपत्र देण्यात येत होते. मात्र, गुरुवारी (ता.३) मंत्रालयात कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे आकाशवाणी प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी झाली. परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

दुपारी अडीचनंतर सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातील अभ्यागत कक्षात मोठी गर्दी झाली. यापुढेही दुपारी दोन वाजता प्रवेश देण्यात येईल. दुपारी चारपर्यंत मुख्यमंत्री कामकाजाच्या दिवशी भेटणार आहेत. ज्या नागरिकांची निवेदने असतील ती स्वीकारण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रवेश नियम कडक केले आहेत.

Shinde $ Fadanvis
Crop Insurance : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com