Chili Pest : किडीच्या प्रादुर्भावाने मिरचीचे पीक खराब

मिरचीचे उत्पादन नगदी पीक म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु हवामान बद्दलामुळे ‘थ्रीप्स’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीस आले आहेत.
Chili Crop Pest
Chili Crop PestAgrowon

नागपूर : मिरचीचे उत्पादन (Chili Production) नगदी पीक म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु हवामान बद्दलामुळे (Climate Change) ‘थ्रीप्स’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीस आले आहेत. या रोगाचा पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Chili Crop Pest
Green Chilies Rate : नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट : दर स्थिर

जिल्ह्यात १०३३५ हेक्टर आर क्षेत्रात मिरची लागवड केली जाते. जवळपास ४२,३४० टन मिरचीचे उत्पादन होते. थ्रीप्स फुलातील रस शोषून घेतात. त्यामुळे फुलबहर गळत आहे. उत्पादनात घट होत आहे. सोबतच किडीमुळे उत्पादित मिरचीवर काळे डाग पडतात. याचा परिणाम मिरचीच्या गुणवत्तेवर झाला तर दरात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Chili Crop Pest
Chili Intercrop : मिरचीत मेथीचे आंतरपीक

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या आधीच मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करण्यास सुरुवात केली. पण आताच्या या रोगामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, की मिरचीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना रोप लागवडीपासूनच कीडनियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, ‘ब्लॅक थ्रीप्स’चा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे यासाठी वापरलेली कीटकनाशकेसुद्धा फेल ठरली आहेत. सध्या हिरव्या मिरचीचा दर २० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कृषी विभागाने योग्य सल्ला देऊन शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

सध्या तरी अशा प्रकारे कोणतीही बाब निर्दशनास आलेली नाही. मात्र आम्ही याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना रोग निदानाच्या संबंधी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करू.

- संदीप नाकाडे, तालुका कृषी अधिकारी, मौदा

-

दोन एकर शेतात मिरचीचे पीक होते. मात्र ‘थ्रीप्स’ आल्याने व अतिवृष्टीमुळे झाडे खराब होऊन पूर्ण बाग नष्ट करून दुसरे पीक घेतले आहे. मागील वर्षी पण फुलकिडा, बुरशीमुळे बागा नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी.

- सूर्यकांत ढोबळे, मिरची उत्पादक, बोरगाव

मागील दोन वर्षांपासून मिरची पिकाला भाव समाधानकारक मिळत आहे. म्हणून हे पीक घ्यायला सुरुवात केली. मात्र यंदाच्या वर्षी मिरचीचा एकही तोडा न करता या रोगामुळे बाग पूर्ण खराब झाल्याने आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे शासनाने मदत द्यावी.

- अर्जुन देवतारे, मिरची उत्पादक, आष्टी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com