G-2- Summit : जी-२० परिषदेच्या तयारीत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यासह शहराची विविधता दाखविण्याची एक संधी आहे. जी-२० परिषदेची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
G-20 Summit
G-20 SummitAgrowon

औरंगाबाद : जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (G-20 Summit) निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यासह शहराची विविधता दाखविण्याची एक संधी आहे. जी-२० परिषदेची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी या निमित्ताने ‘चला शहर घडवूया’ (Chala Shahar Ghadvuya) या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय (Astk Kumar Pamdey) यांनी केले.

G-20 Summit
Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची मोहीम सुरू

जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी नुकताच आढावा घेतला. मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, की जी-२० परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद महानगराला प्रदर्शित करण्याची संधी मिळत आहे. जागतिक पातळीवर महानगराची वेगळी ओळख होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू असून यामध्ये महानगरातील नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी ‘चला शहर घडवूया’ या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यायचा आहे.

यामध्ये नागरिकांनी आपले घर तसेच परिसर स्वच्छ ठेवणे, घराची रंगरंगोटी करणे, दिवाळीप्रमाणे घराला विद्युतीकरण करणे तसेच आपल्या सोसायटीचे सुशोभीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करू नये, सिग्नलचे पालन करणे, शासकीय समाज माध्यमे फॉलो करणे, रिपोस्ट करणे, सकारात्मक पद्धतीने शहराची ओळख करून देणे यासोबतच ऐतिहासिक स्थळांबाबत छोटीशी चित्रफीत, पोलिस, सफाई कामगार तसेच समाजोपयोगी उपक्रमांबाबत व्हिडिओ करून समाज माध्यमांवर पाठविणे या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. सामान्य नागरिकांच्या सहभागातून जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराचेही ब्रॅडिंग होण्यास मदत होणार आहे.

G-20 Summit
Soybean Market : सोयाबीन बाजार आज कसा राहीला?

शासकीय कार्यालयांचेही सुशोभीकरण महत्त्वाचे असून इमारतीवर विद्युतीकरण, सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी, विमानतळावरून बाहेर पडताना वाहनांचे नियोजन, परिषदेच्या निमित्ताने नियंत्रण कक्ष, नियोजनाबाबत पुस्तिका, परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम सुविधा पुरवण्यासोबतच सांस्कृतिक पंरपरा तसेच औद्योगिक व पर्यटनस्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com