Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये

पीक पद्धतीचा अंगीकार करा : पटेल
Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये

संग्रामपूर, जिल्हा. बुलडाणा : ‘‘सध्या शेतीतील उत्पन्न (Agricultural Business) वाढवण्यासाठी आपल्याला उत्पादन (Agricultural Production) खर्च कमी करण्याची खूप गरज आहे. यासाठी अधिकाधिक प्रमाणात स्थानिक पातळीवरच निविष्ठा तयार करून त्याचा वापर वाढवावा

Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये
Agri Business Management : कृषी क्षेत्रात करिअरला उत्तम पर्याय ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’

तसेच बदलत्या वातावरणाचा अंदाज घेत शेतीमध्ये पीक पद्धतीचा अंगीकार करावा, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी,’’ असा सल्ला खामगाव उपविभागीय कृषी अधिकारी डी.एस. पटेल यांनी दिला. वानखेड येथे सूर्यवंशी बारी समाज तसेच नागवेली नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने

Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये
Soybean Verity : ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

सोमवारी (ता.तीन) रात्री गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कृषी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव भोपळे होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यातज्ज्ञ संजय उमाळे,

Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये
Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

कीडरोग तज्ज्ञ अनिल गाभणे, माजी उपसभापती सुभाषराव हागे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी वासुदेव ढगे, प्राचार्य अशोक भुते, शिक्षक पी.एम. हागे, माजी सभापती लीलाबाई दामदर, माजी सरपंच सूर्यभान रौंदळे, समाधान रौंदळे, रामदास भोपळे, वासुदेव सांगळे, वासुदेवराव दामदर, ग्रामपंचायत सदस्य विलास हागे, संतोष कुऱ्हाडे, मंडाळाचे अध्यक्ष विष्णू हागे, ग्रामपंचायत लिपिक शालीग्राम हागे इतर मान्यवर उपस्थित होते.

Crop Protection : बदलत्या वातावरणाचा अंदाज शेतीमध्ये
Punjab Agri Budget: पंजाबमध्ये शेती क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदीत १५० टक्के वाढ?

श्री. उमाळे यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या शेतीपद्धतीचा वापर करण्याचे सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचा संदर्भ देत कमी खर्चाची शेती करण्याचे आवाहन केले. श्री. गाभणे यांनी या वेळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे सांगितले. श्री. ढगे, प्राचार्य भुते यांनीही मार्गदर्शन केले.

वासुदेवराव दामदर, ग्रामपंचायत सदस्य विलास हागे, संतोष कुऱ्हाडे, मंडाळाचे अध्यक्ष विष्णू हागे, ग्रामपंचायत लिपिक शालीग्राम हागे इतर मान्यवर उपस्थित होते. श्री. उमाळे यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या शेतीपद्धतीचा वापर करण्याचे सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचा संदर्भ देत कमी खर्चाची शेती करण्याचे आवाहन केले. श्री. गाभणे यांनी या वेळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे सांगितले. श्री. ढगे, प्राचार्य भुते यांनीही मार्गदर्शन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com