Grape Spraying : ढगाळ वातावरण; द्राक्षावर रोग प्रतिबंधात्मक फवारण्या

चालू आठवड्याच्या सुरुवातीला तापमानात घसरण होऊन निफाड येथील गहू संशोधन केंद्रावर सोमवारी (ता. २) तापमान ७.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले होते. त्यानंतर किमान तपमानात वाढ झाल्याचे दिसून आले.
Grape Spraying
Grape Spraying Agrowon

नाशिक : चालू आठवड्याच्या सुरुवातीला तापमानात घसरण होऊन निफाड येथील गहू संशोधन केंद्रावर सोमवारी (ता. २) तापमान ७.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले होते.

त्यानंतर किमान तपमानात वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी (ता. ५) तापमान १०.५ इतके नोंदविले गेले. मात्र सकाळी धुके तर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.

हवेत गारवा अधिक असल्याने थंडी जाणवत होती. परिणामी द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले असून संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जात आहेत.

Grape Spraying
Grape Management : ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

गुरुवारी किमान तापमानात वाढ झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने अडचणी वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळी अनेक ठिकाणी धुके पडले होते. तर दुपारपर्यंत हवेत गारवा अधिक जाणवला. या परिस्थितीत द्राक्ष, कांदा यांसारख्या पिकावर संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

सफेद वाणाच्या तुलनेत ही थंडी रंगीत वाणांसाठी फायद्याची आहे; मात्र ढगाळ वातावरण व थंडी अशीच राहिल्यास मणी तयार झालेल्या व साखर उतरण्याच्या अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये तडे जाण्यासह भुरी, मिलीबग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सावध असून फावरण्या सुरू असल्याचे दिसून आले.

Grape Spraying
Grape Management : ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेत फवारणीची लगबग

कांद्यावर निरीक्षणे नोंदवून शिफारशींनुसार फवारण्या घ्याव्यात
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाची शक्यता आहे.

पुढील काही दिवस वातावरण नेमके कसे राहील यावर सर्व अवलंबून असेल. त्यामुळे निरीक्षणे नोंदवून शिफारशींनुसार फवारण्या घेण्याची गरज आहे,

असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राकेश सोनवणे यांनी दिला.

थंडी वाढल्यास द्राक्षबागेसाठी अडचणींची शक्यता
 

बागांच्या अवस्थेनुसार द्राक्षमणी वाढ व फुगवण मंदावण्याची शक्यता
 

बागा तयार होण्याची प्रक्रिया संथ होईल
 

ढगाळ वातावरण व थंडी राहून दव पडल्यास ज्या ठिकाणीं बागा १४ ते १५ ब्रिक्सच्या पुढे साखर उतरण्याच्या अवस्थेत किंवा काढणीसाठी शेवटच्या टप्प्यात आहेत अशा ठिकाणी मण्यांना सूक्ष्म तडे (हेअर क्रॅकिंग) जाण्याची शक्यता
 

‘फ्लेम’सारखे वाण अशा वातावरणात संवेदनशील
  सफेद वाणांमध्ये गुलाबी मणी होण्याची शक्यता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com