Cloudy Weather : खानदेशात ढगाळ वातावरण

खानदेशात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे केळी, पपई उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. पाऊस आल्यास रब्बीतही मोठी हानी होईल, अशी भीती आहे.
Cloudy Weather
Cloudy WeatherAgrowon

जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. यामुळे केळी, पपई उत्पादकांसह (Banana Producer) इतर शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. पाऊस आल्यास रब्बीतही (Rabi Crop) मोठी हानी होईल, अशी भीती आहे. मध्यंतरी कोरडे व निरभ्र वातावरण (Dry Weather) होते.

Cloudy Weather
Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ

यामुळे रब्बीची पेरणीही वेगात झाली. तसेच हरभरा, गहू पिकाची वाढही बऱ्यापैकी दिसत होती. थंडी वाढेल, अशी अपेक्षा होती. किमान तापमान १२ अंश सेल्सीअसखाली आले होते. परंतु मागील तीन दिवसांत ढगाळ वातावरणामुळे थंडीही गायब झाल्याची स्थिती आहे. उकाडा जाणवत आहे. यामुळे पिकांवर रोगराई येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Cloudy Weather
Weather Update : किमान तापमानात मोठी वाढ; थंडी गायब

सकाळपासून ढगाळ वातावरण असते. मध्येच मंद वारा सुटतो. सूर्यदर्शन अधूनमधून होते. सूर्यदर्शन होत नसल्याने केळी व इतर पिकांच्या वाढीला अडथळा येवू शकतो. पपई काढणीवर आहे. तसेच केळीही वाढीच्या स्थितीत आहे. काही भागात केळीची काढणीही सुरू आहे. निरभ्र वातावरणात काढणीला किंवा खरेदीला वेग येतो. परंतु वातावरण ढगाळ, पावसाळी असल्याने खरेदीदारही केळी, पपईची खरेदी टाळतात. अशात पाऊस, गारपीट झाल्यास मोठी हानी होईल, अशी भिती शेतकऱ्यांना आहे.

Cloudy Weather
Weather Update : तापमानात पुन्हा वाढीची शक्यता

काही शेतकरी केळीची काढणी करून घेत आहेत. त्यासाठी कमी दरही स्वीकारत आहेत. कारण पाऊस, गारपीटीनंतर दर कमी होतात. तसेच पुढे आवक वाढते. परिणामी शेतकरी काढणी करून घेताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाला अधिक फटका बसू शकतो. कारण त्यात मर, शेंडे करपण्याची समस्या तयार होवू शकते. खानदेशात हरभरा पीक सुमारे दोन लाख हेक्टरवर आहे.

कोरडवाहू हरभरा अधिक आहे. त्यामुळे त्याचेही नुकसान शक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. पण सुदैवाने पाऊस कुठेही झालेला नाही. पाऊस झाल्याल कलिंगड, भाजीपाला पिकांची लागवड रखडू शकते. यामुळे शेतकरी निरभ्र, कोरड्या वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. थंडी वाढल्यास त्याचा पुढे रब्बीला अधिकचा लाभ होईल, असाही मुद्दा उपस्थित करीत आहेत.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांत पुढे रोगराई येईल. हरभरा, ज्वारीवर फवारण्या घ्याव्या लागतील. यामुळे उत्पादन खर्च वाढेल. तसेच पीकहानी काही अंशी होईल. कोरडे व निरभ्र वातावरण आवश्यक असून, थंडीची प्रतीक्षा आहे. मागील दोन महिने थंडी अपवाद वगळता नव्हती.
लीलाधर खडके, शेतकरी, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com