Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे रब्बीवर संकटाचे सावट

चार दिवसांपूर्वीपर्यंतचा रब्बीचा प्रवास सुखद राहिला असला तरी सध्या ढगाळ वातावरण व धुक्याची चादर रब्बी पिकांवरील संकट वाढवते आहे.
Cloudy Weather
Cloudy Weather Agrowon

औरंगाबाद ः चार दिवसांपूर्वीपर्यंतचा रब्बीचा (Rabi Season) प्रवास सुखद राहिला असला तरी सध्या ढगाळ वातावरण (Cloudy Weather) व धुक्याची चादर (Foggy Weather) रब्बी पिकांवरील संकट वाढवते आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख ६९ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी झाली. ती सरासरीच्या १०३ टक्के आहे.

Cloudy Weather
Cloudy Weather : फळबाग उत्पादक धास्तावले

दुसरीकडे लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत सरासरी १३ लाख ६३ हजार ९३१ क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात १६ लाख ११२ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या ११७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यातही हरभऱ्याचे पीक सर्वाधिक क्षेत्रावर आहे.

त्यामध्ये लातूर कृषी विभागातील ११ लाख १६ हजार १६३ हेक्टर व औरंगाबाद कृषी विभागातील ३ लाख १५ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचा समावेश आहे. खास करून रब्बी ज्वारी, हरभरा, मका व गहू आदी प्रमुख पिकांवर हे संकट अधिक गडद असणार आहे.

Cloudy Weather
Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची घालमेल

यंदाच्या खरीप हंगामातील पिके अतिवृष्टी, सततचा पाऊस आदींमुळे हातची गेली. आता सर्व मदार रब्बीवर असताना त्यावरही कीड रोगांचे आक्रमण होते की काय अशी स्थिती आहे. चार दिवसांपासून मराठवाड्यात सर्व दूर पहाटेपासूनच गडद धुक्याची चादर पसरते आहे.

या प्रतिकूल वातावरणामुळे मका, ज्वारी, गहू, हरभऱ्यासह फळ पिकांमध्ये डाळिंब, द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रब्बीवर घोंगावणाऱ्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

चार ते पाच दिवसांपासून धुके पडते आहे. अपेक्षित थंडी नाही. अधूनमधून थंडी जाणवते आहे. कीड आणि रोगांना पोषक वातावरण आहे.

- सदाशिव गीते,

देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

धुक्याची चादर संकटात वाढ करते आहे. तिचा काळही वाढतो आहे. त्यात ढगाळ वातावरण रब्बीसह फळ पिकांवर कीड रोगांना आमंत्रण देणारेच आहे.

- अॅड. अमोल रणदिवे, उस्मानाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com