Weather Update : गारठा कमी, उकाडा वाढला

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. सोमवारी (ता. ७) राज्यात पहाटे गारठा काहीसा कमी होऊन दुपारी उकाडा वाढल्याचे चित्र होते.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Minimum Temperature) चढ-उतार होत आहेत. सोमवारी (ता. ७) राज्यात पहाटे गारठा (Cold Weather) काहीसा कमी होऊन दुपारी उकाडा (Heat) वाढल्याचे चित्र होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र (Wheat Research Center) येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची, तर सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत उद्यापर्यंत (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली तमिळनाडू पदूच्चेरीकडे येताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरापासून श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत होते. तर दिवसभर उन्हासह कोरडे वारे वाहत होते. मात्र सोमवारी (ता. ७) राज्याच्या अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

Weather Update
Agriculture Electricity : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘ठिय्या’

काहीशा ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाली. राज्यात किमान तापमान ११ ते २१ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३० ते ३६ अंशांच्या आसपास होते. आज (ता. ८) राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.६ (१३.२), नगर - (१४.१), जळगाव ३५.३ (१४.५), धुळे ३३.६ (१२.५), कोल्हापूर ३१.६ (१८.९), महाबळेश्वर २७.१(१५.६), नाशिक ३१.३ (१२.८), निफाड ३२.२ (११.८), सांगली ३२.९(१७.१), सातारा ३१.६(१५.५), सोलापूर ३४.६ (१६.५), सांताक्रूझ ३६.१(२०.६), डहाणू ३५.९ (१९.९), रत्नागिरी ३५.९ (२१.०), औरंगाबाद ३१.८ (१३.९), नांदेड ३२.८ (१७.२), उस्मानाबाद - (१७.६), परभणी ३२.० (१५.४), अकोला ३५.० (१८.१), अमरावती ३५.४ (१५.७), बुलडाणा ३२.० (१७.५), ब्रह्मपुरी ३३.९ (१९.०), चंद्रपूर ३१.२ (१९.०), गडचिरोली ३१.८(१६.२), गोंदिया ३२.६(१६.८), नागपूर ३३.९ (१७.३), वर्धा ३३.०(१८.०), वाशीम ३२.८ (१६.८), यवतमाळ ३३.५ (१६.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com