Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

राज्याच्या किमान तापमानात होतेय घट
Cold Weather
Cold WeatherAgrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्रासह लगतच्या भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने गारठा वाढला आहे. आज (ता. २) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Cold Weather
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

रविवारी (ता. १) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक येथे किमान तापमान १० अंशांवर आले असून, औरंगाबाद येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता. उन्हाचा चटका कायम असल्याने राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Cold Weather
Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता

उत्तर भारतात थंडीची लाट वाढतच आहे. राजस्थान थंडीची तीव्र लाट, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यात आज (ता. २) थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. १) राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.


रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२ (१२.५), जळगाव ३०.७ (११), धुळे २९ (९.६), कोल्हापूर ३१.४ (१८.७), महाबळेश्वर २७.१(१३.९), नाशिक २९.६ (१०), निफाड ३०.२ (७.८), सांगली ३१.५ (१७.३), सातारा ३१.८(१४.९), सोलापूर ३४.२ (१७.६), सांताक्रूझ ३१.१(१५.६), डहाणू २७.६ (१७.३), रत्नागिरी ३४ (२०), औरंगाबाद ३०.४ (१०.७), नांदेड ३२ (१६.६), उस्मानाबाद - (१६), परभणी ३२.१ (१६.५), अकोला ३२.९ (१५.९), अमरावती ३२.० (१५.५), बुलडाणा ३०.६ (१४.२), ब्रह्मपुरी ३२ (१५.४), चंद्रपूर ३० (१७.४), गडचिरोली ३०(१३.४), गोंदिया २९.८(१४.५), नागपूर ३०.७ (१५.६), वर्धा ३२.०(१५), यवतमाळ ३०.५ (१५.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com