Vidarbh Clod Wave : पूर्व विदर्भात थंडीची लाट

गेले काही दिवस सातत्याने दिसणारी दाट धुक्याची चादर काहीशी कमी होत आहे. रविवारी (ता. ८) पूर्व विदर्भातील गोंदिया, नागपूर येथे थंडीची लाट आली आहे.
Cold Weather Update
Cold Weather UpdateAgrowon

पुणे : गेले काही दिवस सातत्याने दिसणारी दाट धुक्याची (Foggy Weather) चादर काहीशी कमी होत आहे. रविवारी (ता. ८) पूर्व विदर्भातील गोंदिया, नागपूर येथे थंडीची लाट (Cold Wave) आली आहे.

गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ९) विदर्भाच्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा कायम असून, राज्यातही गारठा (Cold Weather) वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Cold Weather Update
Cold Weather : विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता

रविवारी (ता. ८) राज्यात काही ठिकाणी धुके पहायला मिळाले. धुके आणि ढगाळ वातावरण दूर होऊ लागताच किमान तापमानात घट होऊ लागली आहे.

पूर्व विदर्भात थंडीची लाट आली असून, गोंदियासह नागपूर, गडचिरोली, वर्धा, ब्रह्मपूरी, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांखाली आले आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमान १० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. ८) उत्तर राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Cold Weather Update
Cold Weather : राज्याच्या अनेक भागांत धुक्याची दुलई

आज (ता. ९) हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा या राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २७.४ (१३.४), जळगाव २८.५ (११.०), धुळे २८.५ (८.६), कोल्हापूर २८.१ (१७.२), महाबळेश्वर २१.६(१२.३), नाशिक २७.२ (१३.०), निफाड २७.८ (१०.०), सांगली २७.८ (१६.२), सातारा २७.९(१४.३), सोलापूर ३०.२ (१४.८), सांताक्रूझ ३२.८ (२१.२), डहाणू ३२.१ (२१.०), रत्नागिरी ३३.९ (२२.८),

औरंगाबाद २७.६ (९.४), नांदेड २७.६ (१२.८), उस्मानाबाद - (१०.१), परभणी २७.८ (१२.०), अकोला ३०.५ (११.०), अमरावती २९.० (१०.४), बुलढाणा २७.४ (११.५), ब्रह्मपूरी २९.० (९.६), चंद्रपूर २६.२ (१०.२), गडचिरोली २७.०(९.४), गोंदिया २७.०(६.८), नागपूर २६.६ (८.०), वर्धा २७.०(९.४), यवतमाळ २७.० (१०.७).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com