
अलिबाग : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. थंडीमुळे (Cold Weather) मासळी (Fishing) मिळण्याचे प्रमाण घटल्याने बाजारात आवक मंदावली (Fishing Market) आहे. पर्यायाने उपलब्ध मासळीचे दर वधारले आहेत.
खराब वातावरणामुळे कोकणातील आंबा (Mango), काजू फळपीक (Kaju), शेतीवरच परिणाम होतो असून मत्स्य व्यवसायातील अडचणी वाढू लागल्या आहेत. समुद्रातील अंतर्गत घडामोडींमुळे मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे अलिबागमधील मच्छीमारांचे म्हणणे आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला बांगडा मुबलक प्रमाणात मिळत होता; मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मासळी मिळाल्याने दरात कमालीची घट झाली. डिसेंबरच्या सुरुवातीपासून ताज्या मासळीच्या किमतीत वाढ झाली होती.
मध्यंतरी समुद्रात पावसाळी वातावरण तयार झाल्याने मासेमारीत व्यत्यय आला होता. रायगडच्या किनारपट्टीवर दुसऱ्या जिल्ह्यातील नौका आश्रयाला आल्या होत्या.
त्यामुळे मासळीची आवक मंदावली होती. आता वातावरण स्थिर होत असताना थंडीमुळे मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
खाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जास्त जाणवत असल्याने मासेमारीला जाण्यास कामगारही उत्सुक नाहीत. बंदरात मासळी येण्याचेही प्रमाण कमी असल्याने व्यापारी, वाहतूकदार, मच्छी स्वच्छ करणाऱ्या महिलाही बंदरात दिसेनाशा झाल्या आहेत.
मासळी सुकवण्याचे ओटे रिते
थंडीत संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढते. अशा वेळी प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मांसाहार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे अंड्यांसह ताज्या मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात मासळीची मोठी उलाढाल होते.
नव्या हंगामात मिळालेली मासळी विकल्यावर राहिलेली मासळी सुकवली जाते.मात्र नवीन वर्ष सुरू झाले तरी बंदरातील मासळी सुकवण्याचे ओटे रिकामी दिसत आहेत.
सतत बदलते वातावरण
मध्यंतरी काही दिवस थंडी पडल्यानंतर वातावरणातील तापमानात पुन्हा वाढ झाली होती. त्यामुळे किनारी भागात पावसाची शक्यता वर्तवली जात होती.
सध्या किनारी भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मासळी मिळण्याच्या प्रमाणात घट झाल्याने स्थानिक बाजारात मासळीची आवक घटल्याचे चित्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.