Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे, नाशिक येथे पारा १० अंशांच्या खाली आला आहे.
Cold Weather Update
Cold Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाल्याने गारठा (Cold Weather) कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे, नाशिक येथे पारा १० अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. २६) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Cold Weather Update
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

किमान तापमानात घट झाल्याने रविवारी (ता. २५) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान कायम होता.

दरम्यान निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानात तफावत असल्याने पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती कायम आहे.

Cold Weather Update
Cold Weather : थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता

राजस्थानातील चूरू येथे रविवारी (ता. २५) देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थान, गुजरात या राज्यांमध्येही थंडीच्या लाटेचा इशारा असून, पंजाब, हरियाना, चंडीगड येथे थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. तर हरियाणा, चंडीगड, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंकेजवळील तीव्र कमी दाब क्षेत्र कायम

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) कायम आहे. ही प्रणाली तामिळनाडूच्या नागापट्टीनमपासून ४८० किलोमीटर ईशान्येकडे तर चेन्नईपासून ५०० किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात होती. हे तीव्र कमी दाब क्षेत्र उद्यापर्यंत (ता. २६) भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४ (१२.२), जळगाव - (१०.७), धुळे २८.० (७.४), कोल्हापूर ३०.९ (१७.३), महाबळेश्वर २७.०(१४.६), नाशिक ३०.५ (९.८), निफाड ३०.१ (७.०), सांगली ३२.० (१५.३), सातारा ३२.७(१३.८), सोलापूर ३४.० (१६.४), सांताक्रूझ ३०.०(१५.०), डहाणू २६.८ (१५.५), रत्नागिरी ३१.५ (१५.०), औरंगाबाद ३२.४ (१५.८), नांदेड - (१६.०), परभणी ३१.८ (१४.६), अकोला ३१.५ (१६.०), अमरावती ३२.० (१५.०), बुलढाणा २९.२ (१४.८), ब्रह्मपूरी ३३.९ (१५.९), चंद्रपूर २९.८ (१७.०), गडचिरोली ३१.४(१२.०), गोंदिया ३१.०(१४.४), नागपूर ३१.२ (१५.०), वर्धा ३२.५(१५.३), यवतमाळ ३१.५ (१६.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com