Cold Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठ्याचा अंदाज

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला असला, तरी राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.
Cold Weather
Cold WeatherAgrowon

पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत थंडी (Cold) कायम आहे. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Cold Weather
Cold weather : खानदेशात हुडहुडी कायम

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला असला, तरी राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.

रविवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर निफाड, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, तापमानाचा पारा २६ ते ३३ अंशांच्या आसपास आहे.

दरम्यान, पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. थंडीची लाट आल्याने रविवारी (ता. १५) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Cold Weather
Cold wave : थंडी हळूहळू वाढणार

आज (ता. १६) पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज कायम आहे.

रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.१ (१०.७), जळगाव २७ (७.८), धुळे २६ (५.५), कोल्हापूर ३१.७ (१६),

महाबळेश्‍वर २६.१(१३.७), नाशिक २८.३ (८.४), निफाड ३०.८ (६.३), सांगली ३१.३ (१४.९), सातारा ३३ (१२.७), सोलापूर ३३.६ (१५.६), सांताक्रूझ २६.२ (१३.८), डहाणू २४.२ (१३.१), रत्नागिरी २८ (१५.८), औरंगाबाद २८.५ (८.८),

नांदेड - (१४.६), परभणी २९.२ (१३.५), अकोला ३०.५ (१३.२), अमरावती २९.४ (१३), बुलडाणा २६.२ (१२.४), ब्रह्मपुरी ३०.२ (१५), चंद्रपूर २९ (१५.८), गडचिरोली ३०.२ (१२.४), गोंदिया २९.२ (१२.८), नागपूर २९.२ (१२.८), वर्धा ३० (१३.६), वाशीम - (१२.८), यवतमाळ २९.२ (१२.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com