Cold Weather :राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज

उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्यात हुडहुडी कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Cold Weather
Cold WeatherAgrowon

पुणे : उत्तरेकडील थंडीने (Cold) महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्यात हुडहुडी कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ११) राज्यात वाढलेला गारठा (Cold Weather) कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Cold Weather
Cold Weather : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे हुडहुडी

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट कायम आहे. किमान तापमानात चढ-उतार सुरू असले तरी, मंगळवारी (ता. १०) अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खालीच होता. तर कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान १४ अंशांच्या खाली होते.

Cold Weather
Cold Weather : थंडीत कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना फुटला घाम

एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (ता. १०) राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ११) थंडीची लाट काहीशी ओसरण्याची शक्यता असली तरी गारठा टिकून राहणार आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, त्रिपुरा राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे २९.१ (७.४), जळगाव ३३.२ (५.३), धुळे २८.० (५.५), कोल्हापूर २९.१ (१४.२), महाबळेश्वर २६.६(१२.१), नाशिक २८.१ (७.६), निफाड २८.२ (५.०), सांगली ३०.२ (१२.२), सातारा ३०.२(१०.०), सोलापूर ३२.२ (१३.४), सांताक्रूझ ३२.१ (१७.०),

डहाणू ३०.१ (१६.२), रत्नागिरी ३४.० (१५.८), औरंगाबाद २९.२ (७.७), नांदेड २७.६ (१०.६), परभणी २९.५ (१०.०), अकोला ३०.९ (१०.५), अमरावती ३०.० (११.३), बुलडाणा २८.४ (११.०), ब्रह्मपुरी ३१.१ (११.४), चंद्रपूर २७.६ (१०.८), गडचिरोली २९.०(९.२), गोंदिया २९.०(८.६), नागपूर २९.६ (९.२), वर्धा ३०.०(१०.४), यवतमाळ २९.५ (९.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com