Cold Weather : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

सप्ताहाच्या सुरुवातीला रविवारी (ता. ४) किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी (ता. ६) ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर वातावरण दमट झाले होते.
Cold Weather Nashik
Cold Weather NashikAgrowon

नाशिक : सप्ताहाच्या सुरुवातीला रविवारी (ता. ४) किमान तापमान (Minimum Temperature) ९.६ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी (ता. ६) ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार झाल्यानंतर वातावरण दमट झाले होते. परिणामी किमान तापमानात वाढ होऊन १७.१ अंश सेल्सिअस इतके होते. त्यांनतर शुक्रवारी तापमान (ता. ९) ७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. सकाळपासून थंडीचा कडाका (Cold Weather) पुन्हा वाढला. त्यामुळे पिकांना त्याचा फायदा होणार आहे.

Cold Weather Nashik
Mandous Cyclone : ‘मनडूस’ चक्रीवादळ आज धडकणार

सोमवारी (ता. ५) व मंगळवारी (ता. ६) जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, दिंडोरी, देवळा भागांत तुरळक ते हलका पाऊस झाला. त्याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. रविवारी (ता.४) दुपारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली होती. आता वातावरण निवळले आहे. लेट खरीप कांद्यावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर उन्हाळ कांदा रोपांवर परिणाम होऊन रोपे पिवळी पडली आहेत.

Cold Weather Nashik
Weather Update : राज्यात पावसाचा अंदाज

डाळिंब काढणी सुरु असताना बागेत फूलगळ, तेलकट डाग रोग, तसेच तयार माल फुटणे अशा समस्या दिसून आल्या. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, मिलिबगचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीडनाशकांच्या फवारण्या सुरु आहेत. मात्र आता थंडी वाढल्याने या परिणामांची तीव्रता तुलनेने कमी होणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.‘‘थंडी वाढल्याने वाढीच्या अवस्थेतील गहू पिकाला थंडीचा फायदा होणार आहे,’’ अशी माहिती निफाड कृषी संशोधन केंद्राचे गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यांनी दिली.

निफाड कृषी संशोधन केंद्रावरील तापमान स्थिती (अंश सेल्सिअस)

तारीख कमाल किमान

४ ३०.४ ९.६

५ ३०.२ ९.९

६ ३०.८ १७.१

७ ३१.१ १४.५

८ ३१.० १३.१

९ ३०.८ ७.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com