Weather Update : मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार

राज्याच्या किमान तापमानात चढ- उतार होत असले तरी, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. तर किमान तापमानात वाढ झाल्याने उर्वरित राज्यात थंडी कमी झाली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon


पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ- उतार होत असले तरी, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. तर किमान तापमानात (Minimum Temprature) वाढ झाल्याने उर्वरित राज्यात थंडी कमी झाली आहे.

आज (ता. १९) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात बुधवारी (ता. १८) राज्यातील नीचांकी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथे ८ अंश तर औरंगाबाद येथे ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Weather Update
Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

राज्याच्या उर्वरित भागात तापमानात वाढ झाल्याचे गारठा कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानातही वाढ होत असून, तापमानाचा पारा २७ ते ३५ अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.


पश्चिमी चक्रावाताच्या प्रभाव, हिमालय पर्वत व लगतच्या भागात होत असलेली हिमवृष्टी यामुळे उत्तर भारतातील राज्यात कडाक्याची थंडी आहे. बुधवारी (ता. १८) राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आजपासून (ता. १९) उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग, सिक्कीम, बिहार, ओडिशा, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या काही भागात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

गारठा अधिक असलेली ठिकाणे : निफाड ७.५, धुळे ८.०, औरंगाबाद ९.७.

Weather Update
Weather Update : राज्यात गारठा कायम

चौकट ----
बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४ (१०.५), जळगाव २९.५ (१०.८), धुळे २८.० (८.०), कोल्हापूर ३१.९ (१६.६), महाबळेश्वर २७.१(१३.४), नाशिक ३१.० (१०.५), निफाड ३०.० (७.५), सांगली ३१.५ (१४.८), सातारा ३२.५ (१२.०), सोलापूर ३४.७ (१५.६), सांताक्रूझ २८.८ (१५.५),

डहाणू २५.७ (१४.४), रत्नागिरी ३०.५ (१६.२), औरंगाबाद ३०.४ (९.७), नांदेड ३०.४ (१६.४), परभणी ३२.२(१५.०), अकोला ३१.० (१५.०), अमरावती ३१.३ (१५.१), बुलडाणा २९.० (१४.०), ब्रह्मपुरी ३१.३ (१५.८), चंद्रपूर ३०.६ (१७.६),

गडचिरोली ३०.०(१५.४), गोंदिया २८.५(१३.५), नागपूर २९.७ (१४.०), वर्धा ३०.२(१४.५), वाशीम ३२.९ (-), यवतमाळ ३१.७ (१५.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com