कोरोनातील मृत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित

२८ मृतांच्या नावे १.३४ कोटी रुपयांची थकबाकी
Give enough corona test kits to last till the end of the rainy season
Give enough corona test kits to last till the end of the rainy seasonAgrowon

अमरावती : कोरोना काळात कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अशा परिवाराची आर्थिक घडी विस्कटली आहे. जिल्ह्यात अशा २८ मृतांच्या नावे १.३४ कोटींची थकबाकी आहे.

यातील बहुतांश व्यक्तींचे घर, प्लॉट, शेती बँकांकडे गहाण आहे. त्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता पाहता सहकार आयुक्त यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे माहिती मागितली आहे.

Give enough corona test kits to last till the end of the rainy season
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे नोंद नाही ः तोमर

जिल्ह्यात १५९६ नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. दोन वर्षांमध्ये कोरोनापायी अनेक समस्या उद्‍भवल्या. अनेक परिवारांना याची झळ बसली.

या कुटुंबाची मालमत्ता, घर, प्लॉट, शेती आदी बँकांकडे गहाण आहे. घरातील कर्ताच हिरावल्याने या कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने विविध प्रपत्रात माहिती मागितली होती.

यामध्ये तारण मालमत्ता, गहाण असलेली मालमत्ता, थकीत कर्जाची सद्यःस्थिती आदी बाबींचा समावेश आहे. ही माहिती संकलित करून राज्याच्या सहकार आयुक्तांना पाठवण्यात आली आहे.

यामध्ये सहकारी बँका, पतसंस्थांचे तब्बल ११९ सभासदांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी २८ शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी व्याजामुळे वाढत आहे. यासाठी आता शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Give enough corona test kits to last till the end of the rainy season
खरे थकबाकीदार ‘सरकार’च 

जिल्ह्यातील सहकारी बँकांचे १५ खातेदार दोन वर्षांत कोरोना बळी ठरले. तेरा खातेदार बडे थकबाकीदार आहेत. कर्जासाठी त्यांची शेती, प्लॉट, घरासह अन्य मालमत्ता बँकांकडे गहाण आहे.

या थकबाकीवरील व्याज वाढत असल्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. सोबतच जिल्ह्यातील विविध सोसायट्या, पतसंस्थांच्या १०४ खातेदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. पैकी तेरा खातेदारांकडे अधिक थकबाकी आहे.

त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने दिलासा देण्याकरिता कर्जमाफी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोना संसर्गामुळे मृत थकीत कर्जादारांकडील कर्जाची स्थिती, तारण मालमत्ता याविषयी सहकार आयुक्तांनी अहवाल मागितला होता. ही माहिती संकलित करून अहवाल पाठवण्यात आला आहे.

- महेंद्र चव्हाण, जिल्हा उपनिबंधक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com