
*/
घोडेगाव, जि. पुणे ः दुर्गम ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये (Natural calamity) तातडीचे बचाव कार्य करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे (Disaster Management Authority) आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील ८० आपत्तीमित्रांना घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली.
या प्रशिक्षण शिबिरात पोलिस पाटील, कोतवाल, आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक, आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, मंचर प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार रमा जोशी, खेड अपर तहसीलदार हरेश सुळ यांनी या प्रशिक्षणास भेट दिली.
या वेळी पूर परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीचा बचाव व स्थलांतर कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनीदेखील रेस्क्यू बोटमध्ये बसून आपत्कालीन बचाव करण्याचे प्रात्यक्षिक अनुभवले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या १२ दिवसांमध्ये आपत्ती, आणीबाणी, प्रथमोपचार, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन, भूकंप, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छ्वास आदींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जाऊन मदत कार्य करून जिवीत हानी टाळू शकतात.
या वेळी दोन, तीन, चार हातांची बैठक, स्ट्रेचर, अग्निशमन दल कर्मचारी उचल आदी प्रात्यक्षिक घेण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर, अक्षय चव्हाण, सायली चव्हाण प्रशिक्षणासाठी समन्वयाचे काम करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.