आदिवासी दिनानिमित्त जनसंवाद पदयात्रेस सुरुवात

साधारणतः ७० ते ९० किलोमीटरची ही पदयात्रा असून, आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सुमारे ३० पेक्षा अधिक गावांतून ही पदयात्रा येत आहे.
Tribal Day
Tribal DayAgrowon

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे (75 Years for India Independence) पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने व जागतिक आदिवासी दिनाचे (Tribal Day) औचित्य साधून किसान सभा, आंबेगाव तालुका समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एसएफआय आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने जनसंवाद पदयात्रेला (Jan Samvad Padyatra) गुरुवारी (ता.४) सुरुवात झाली.

साधारणतः ७० ते ९० किलोमीटरची ही पदयात्रा असून, आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सुमारे ३० पेक्षा अधिक गावांतून ही पदयात्रा येत आहे. सुमारे चार दिवस चालून ही पदयात्रा गावागावांत संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करणार आहे. तसेच आदिवासी भागातील विविध धोरणात्मक प्रश्‍नांवर लोकांशी संवाद साधणार आहेत. पेसा, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. ही पदयात्रा, गावात पोहोचल्यावर महापुरुषांना अभिवादन करून त्यानंतर संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन आणि चर्चा केली जाणार आहे. आहुपे व कोंढवळ परिसरातून अशा दोन ठिकाणांहून पदयात्रेला सुरुवात झाली आहे.

Tribal Day
Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, देविका भोकटे, एसएफआयचे अविनाश गवारी, दीपक वाळकोली, समीर गारे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू आहे. तसेच दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, रामदास लोहकरे, लक्ष्मण मावळे, बाळू काठे, शंकर काठे, पुंडलिक असवले, रूपाली खमसे व मंगल तळपे आदी कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com