Salty Soil : क्षारपड जमीन सुधारण्याचे काम कौतुकास्पद : डॉ. वॉकर

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र करणे हे सोपे काम नाही. गणपतराव पाटील यांनी हे केलेले काम कौतुकास्पद असून त्याचा विशेष आनंद आहे.
Soil Health
Soil HealthAgrowon

शिरोळ, जि. कोल्हापूर : क्षारपड जमीन (Salty Soil) सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र करणे हे सोपे काम नाही. गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांनी हे केलेले काम कौतुकास्पद असून त्याचा विशेष आनंद आहे. शेती करताना शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) उपलब्ध करून देण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे.

मिशिगन विद्यापीठ अमेरिका, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई आणि श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक उपयोगी उपाययोजना आणि सहकार्य करता येईल. भविष्यात सामंजस्य करार होईल, त्याचाही फायदा या भागातील शेतकऱ्यांना नक्क्की होईल, असे मत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे कृषी अभियंता डॉ. लॉरी वॉकर यांनी व्यक्त केले.

Soil Health
Soil Fertility : जमीन सुपीकतेवर द्या लक्ष

श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी व अभ्यास दौऱ्यावेळी कारखाना कार्यस्थळावर डॉ. वॉकर बोलत होते. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबईच्या सूक्ष्म जीवशास्त्रमधील संचालिका डॉ. जे. आर. पार्वती यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन संवाद साधण्याच्या उद्देशाने अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. तसेच याबद्दल विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्यात सामंजस्य कराराद्वारे काम सुरू असल्याचे सांगितले.

Soil Health
Soil Management : उतारावरील खोल मशागत नेईल उत्पादन घटीकडे

शेडशाळ येथे महिलांनी स्थापन केलेल्या बीज बँकेची पाहणी करून, ‘सध्या बीज बँक तयार करण्याचे काम छोटे वाटत असले तरी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी हे महत्त्वाचे आहे’, असे डॉ. वॉकर यांनी सांगितले. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी शेडशाळ, घालवाड, शिरोळ या ठिकाणी सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देऊन सर्व तांत्रिक बाजू समजावून घेतल्या.

अभ्यास दौऱ्यात मिशिगन विद्यापीठाचे (अमेरिका) विस्तार विभाग प्रमुख नईम एडवर्ड, सोमय्या कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. ए. डी. कडलग, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. पी. देशमुख, इरिगेशन व ड्रेनेज अभियंता डॉ. एस. डी. राठोड, असोसिएट प्रोफेसर सॉईल सायन्स डॉ. आर. बी. पवार व डॉ. एस. डी. काळे उपस्थित होते. त्याचबरोबर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com