Sericulture : रेशीम कोष दर्जा सुधार, विस्तारासाठी समिती

राज्यात रेशीम शेती अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे निमित्त ठरली आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांबाबत एका राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

नागपूर ः ‘‘राज्यात रेशीम शेती (Sericulture) अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे निमित्त ठरली आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला (Silk Farming) प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांबाबत एका राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीची पहिली बैठक लवकरच नियोजित आहे. त्यातील सूचनांच्या आधारे रेशीम शेतीचा विस्तार व दर्जेदार कोष निर्मितीचे धोरण ठरविण्यात येईल,’’ असे रेशीम संचलनालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Silk Farming
Silk Farming : रेशीम उद्योग अभ्‍यासक्रमासाठी नाव नोंदणी करा

शासन आदेशानुसार पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीत केंद्रीय क्षेत्र योजना ‘सिल्क समग्र-२’ च्या अंमलबजावणीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रेशीम क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी संशोधन व विकास, क्षमता बांधणी व प्रशिक्षण, रेशीम कीटक बीज उत्पादन, बळकटीकरण, विपणन प्रणाली व गुणवत्ता प्रमाणन प्रणाली यासाठी योजना केंद्रीय रेशीम मंडळामार्फत राबविण्यात येईल.

समितीत अध्यक्ष हे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग सचिव, तर सदस्य सचिव उपसचिव (तांत्रिक) असतील. सदस्यांमध्ये संचालक रेशीम संचालनालय नागपूर, वस्त्रोद्योग खात्याचे सहसचिव, केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरचे सदस्य सचिव, केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था (म्हैसूर) संचालक, मूलभूत टरस रेशीम कीट बीज संघटन (बिलासपूर), केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरचे नोडल अधिकारी, शास्त्रज्ञ, नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक, सहाय्यक संचालक यांचा समावेश आहे.

समितीमध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये मे. दिशा सिल्क (जालना), मे. भंडारा सिल्क उद्योग भंडारा, सुनील गावडे (रेशीम शेतकरी, माणिकवाडा, ता. नेर, यवतमाळ), निखिल चौधरी (रेशीम शेतकरी, साखरवाडी, फलटण, सातारा), मंगेश जगन्नाथ कडवकर (चॉकी रिअरिंग सेंटर, तेरखेडा, वाशी, उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.

राज्यात रेशीम शेतीला चालना तसेच कोष उत्पादनाचा दर्जा सुधार याविषयी सूचनांसाठी समितीचे गठण केले आहे. यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचाही समावेश अशासकीय सदस्य म्हणून केला आहे. समितीची एक बैठक येत्या आठवड्यात घेण्याचे नियोजन केले आहे.
महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com