Farmer Suicide : चार वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा या घटनेत वाढ झाली आहे.
Farmer Suicide
Farmer Suicide Agrowon

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने (Drought) अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे (Farmer Suicide) सत्र सुरुच आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा या घटनेत वाढ झाली आहे. यंदा अकरा महिन्यात जिल्ह्यातील १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूला (Farmer Death) कवटाळले आहे. मागील नऊ वर्षाच्या काळात नांदेडमध्ये एकूण ११९५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. २०१५ मध्ये सर्वाधीक १९० घटना समोर आल्या होत्या.

Farmer Suicide
Farmer Suicide : आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायांनी प्रबोधन करावे

नांदेडमध्ये मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा ओला किंवा कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यात सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात.

Farmer Suicide
Farmer Suicide : शेतकऱ्यांभोवतीचा फास सुटेना

काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे कारणे पुढे आली आहेत.

मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली आहे. यंदा अकरा महिन्यात जिल्ह्यातील १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. मागील नऊ वर्षाच्या काळात नांदेडमध्ये एकूण ११९५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

नऊ वर्षांत ११९५ आत्महत्या...

जिल्ह्यात मागील नऊ वर्षांत ११९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२, २०२० मध्ये ७७, २०२१ मध्ये ११९ तर २०२२ मध्ये आजपर्यंत १३८ घटना घडल्या आहेत. २०२२ मधील १३८ आत्महत्येच्या प्रकरणातील १०० प्रकरण पात्र तर २६ अपात्र ठरल्या आहेत. १२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com