फळबाग उत्पादकांना नुकसानभरपाई द्या

तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
Compensate orchard growers
Compensate orchard growersAgrowon

तिवसा, अमरावती (Amaravati) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच संत्राबागांचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना सरकारकडून फळबाग उत्पादकांना वगळण्यात आले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून नुकसानग्रस्तांमध्ये लिंबूवर्गीय पिकांचा समावेश करून नुकसानभरपाईची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले, तर तालुक्यात लिंबूवर्गीय फळपीक व इतर फळ पिकांचे मोठे नुकसान असतानादेखील अनुदानामधून हे पीक समाविष्ट करण्यात आले नाही. प्रशासनाकडून याविषयी योग्य माहिती पुरविण्यात आली नसल्याने फळबाग उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी तहसील कार्यालयावर धडक देत अतिवृष्टीमध्ये फळबाग समाविष्ट करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष योगेश वानखडे, विक्रांत वानखडे, संजय चौधरी, अमित मेटकर, सतीश कडू, संजय राऊत, अतुल कळंबे, उमेश राऊत, राजेश चौधरी, गणेश कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

Compensate orchard growers
केंद्राकडून Tur Import चे पाच वर्षांसाठी करार |Tur Market|ॲग्रोवन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com