Winter Session : मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील इच्छुकांमध्ये चढाओढ

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुक आमदारांची लगबग वाढली आहे.
 winter Session
winter Session Agrowon

अमरावती : हिवाळी अधिवेशनापूर्वी (Maharashtra Assembly Winter Session 2022) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expantion) करण्यात येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुक आमदारांची लगबग वाढली आहे. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावर राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असतानाच माजी राज्यमंत्री व अपक्ष आमदारांमधील कलगीतुराही चांगलाच रंगला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भाजपच्या आमदारांचे नाव वरच्या श्रेणीत असल्याने भाजपमधील इच्छुकांनी पडद्यामागून हालचालींना वेग दिला आहे.

 winter Session
Onion Cultivation : रोपांच्या टंचाईमुळे उन्हाळ कांद्याच्या तुरळक लागवडी

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे मानले जाते. बंड करताना ते सर्वांत अग्रस्थानी होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे, हा त्यांचा नैसर्गिक अधिकार असल्याचे बोलल्या जात आहे. त्याचवेळी अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रत्यक्ष न बोलता रिंगणात उडी

घेतली आहे. त्यांच्या सर्व हालचाली त्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. दिवाळीत या दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक फटाके फुटले. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत दिल्याने थंडावलेल्या राजकीय हालचालींनी पुन्हा वेग धरला आहे.

भाजपमधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने आता वर्णी लागेल, या आशेवर असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू व भाजपला साथ देत उद्धव सेनेवर टीकास्त्र करण्यात अव्वल राहणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 winter Session
Crop Insurance : ‘आठ दिवसांत पीक विमा रक्कम जमा करा’

प्रवीण पोटे व प्रताप अडसड मूळ भाजपचे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून विस्तारात संधी द्यायची आहे. त्यामुळे आमदारांच्या अपेक्षा वाढल्याची चर्चा आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com