कृषी सचिवांसमोर मांडल्या बियाणे फसवणुकीबाबत तक्रारी

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी टनाप्रमाणे वाढीव अनुदान देण्याची मागणीही या वेळी समितीचे टेहरे (ता. मालेगाव) येथील सदस्य चंद्रकांत शेवाळे, बोडके पाटील यांनी केली.
Seed
SeedAgrowon

नाशिक : राज्य शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीची ५२ वी विशेष बैठक मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीदरम्यान समितीचे करंजगाव (ता. निफाड) येथील शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके-पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) व इतर बियाण्यांच्या (Seed) विक्रीमध्ये झालेल्या फसवणुकीच्या (Seed Fraud) तक्रारींचा पाढा कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले (Eknath Dawale) यांच्यासमोर वाचला. त्यामुळे बियाणे गुणवत्ता व फसवणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

Seed
Oil Seed : तेलबियांसाठी हमीभावाची प्रभावी अमंलबजावणी करा

याबाबत बोडके यांनी सांगितले की, सांगली येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीने सोयाबीन बीजोत्पादन घेतले होते. हे बियाणे निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील शेतकऱ्यांना पुरविले होते; मात्र पेरणीपश्चात ते उगवले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर काहींचा हंगाम वाया गेला. यामध्ये जवळपास ५० शेतकऱ्यांना फटका बसला. याबाबत कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्यामुळे निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कृषी सचिवांकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली.

Seed
Seed : बियाणे साठवणूक, विक्रीस्थळ पुराव्यांची प्रणाली सुटसुटीत

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी टनाप्रमाणे वाढीव अनुदान देण्याची मागणीही या वेळी समितीचे टेहरे (ता. मालेगाव) येथील सदस्य चंद्रकांत शेवाळे, बोडके पाटील यांनी केली.

तेलबिया उत्पादन वाढीसाठी संशोधन होण्याची गरज

सोयाबीन, तीळ, जवस, करडई, सूर्यफूल यासह इतर तेलपिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील कृषी संशोधन केंद्रांनी यावर काम करून अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे संशोधन करावे. तशा बियाण्याची उपलब्धता करून द्यावी. त्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी या वेळी दिले.

शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बियाणे उपसमितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत फसवणूक झाल्यास ७५८८०३६४३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल.

- खंडू बोडके पाटील, सदस्य-राज्य बियाणे उपसमिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com