Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरण चार दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

गुरांचे लसीकरण चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले. चांदूर बाजार पंचायत समितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. गटविकास अधिकारी एस. डी. श्रृंगारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज सोळंके यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

अमरावती : लम्पी स्कीन (Lumpy Skin) या पशुरोगाला प्रतिबंध करण्यासाठी गुरांचे लसीकरण (Animal Vaccination)चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले. चांदूर बाजार पंचायत समितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. गटविकास अधिकारी एस. डी. श्रृंगारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज सोळंके यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : सोलापुरात १३ गावांत लसीकरणाला वेग

ही लस पूर्णपणे विनामूल्य आहे. गुरांना लस देण्यासाठी पैसे आकारल्यावरून एका कर्मचाऱ्याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. असा गैरप्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. पंडा यांनी या वेळी दिला. चांदूर बाजार तालुक्यात २६ हजार ५०० गोवंश जनावरांपैकी ३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून

Lumpy Skin
Goat Farming : शेळीपालनातून आर्थिक प्रगतीची दिशा

उर्वरित लसीकरण पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पंडा यांनी दिले. या आजाराला मुख्यत्वे गायवर्ग बळी पडतो. म्हैसवर्ग बाधित होतो. तथापि, म्हशींची प्रतिकारशक्ती अधिक असते. शेळ्या व मेंढ्यांमध्ये हा आजार आढळत नाही. बाधित गावांच्या पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांचे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लक्ष ६५ हजार ५०० लसपुरवठा झाला आहे.

खासगी पशुवैद्यकांचीही मदत घेण्यात आली असून प्रति मात्रा ३ रुपयांप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांना कीटकनाशक फवारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे,

असे डॉ. सोळंके यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर ०७२१-२६६२०६६ हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जनावरांमध्ये आजार आढळल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे १९६२ हा टोल फ्री क्रमांकही कार्यान्वित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com