Canals Projects : अजोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

‘‘भूसंपादनाभावी रखडलेली कालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच भूसंपादनाचे प्रश्न सोडवून जोड कालव्याची कामे पूर्ण करा,’’ अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
Canals Projects
Canals ProjectsAgrowon

सातारा : ‘‘भूसंपादनाभावी रखडलेली कालव्यांची (Canels) कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच भूसंपादनाचे प्रश्न सोडवून जोड कालव्याची कामे पूर्ण करा,’’ अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये सोमवारी (ता.३१) कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

Canals Projects
Crop Advisory : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला

या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे त्यांची क्षमता कमी होत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ‘‘हा गाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच मोठे राज्यमार्ग व जिल्हा मार्गांच्या कामांसाठी भराव म्हणून वापरता येईल.

त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवाने द्यावेत व सिंचन विभागाने संबंधित बांधकाम विभागाशी संपर्क साधावा. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना शासन राबवतच आहे. त्यामुळे या विषयामध्ये अडचण येण्याचे कारण नाही. शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीच्या दृष्टीने कार्यवाही करावी.

सिंचनाखाली येणारी जमीन आणि वसूल होणारी पाणीपट्टी यांची मोजणी करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करून नेमका हिशोब मांडावा,’’ अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. बैठकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी धरणांमधील गाळ काढण्याबाबत सूचना केली. आमदार जयकुमार गोरे आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी उरमोडी धरणाच्या कालव्यातून पाण्याची आवर्तने तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तर, आमदार अनिल बाबर यांनी जोड कालव्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. डोईफोडे यांनी रब्बी हंगामासाठीच्या पाणी वाटपाच्या नियोजनाचे सादरीकरण केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com