Manjara River: ‘चला जाणूया नदीला’चा समारोप

मांजरा नदीचे उगमस्थान असलेल्या गवळवाडी (ता. पाटोदा) येथून अभियानास सुरुवात झाली होती. देवळात गावातील महिलांनी जल कलशाचे पूजन केले.
Beed River program
Beed River programAgrowon

बीड : जिल्ह्यातील चला जाणूया मांजरा नदीला (Manjara River) अभियानाचा समारोप देवळा (ता. अंबाजोगाई) येथे झाला.

मांजरा नदीचे उगमस्थान असलेल्या गवळवाडी (ता. पाटोदा) येथून अभियानास (campaign) सुरुवात झाली होती. देवळात गावातील महिलांनी जल कलशाचे पूजन केले.

यावेळी नदी यात्रेविषयीची गावकऱ्यांना (Villagers) चित्रफीत दाखविण्यात आली.

अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया, मानवलोकचे सहकार्यवाह लालासाहेब आगळे, सरपंच रावसाहेब यादव, इन्फंटचे दत्ता बारगजे, कृषीचे सूर्यकांत वडखेलकर, राजाराम

बन आदींसह विविध विभागांचे कर्मचारी, नदीयात्रेकरू, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अनिकेत लोहिया म्हणाले, खते आणि कीटकनाशके यांच्या अति वापरामुळे, नद्यांत सोडण्यात येणारे सांडपाणी, कचऱ्यामुळे नद्या दूषित होत आहेत.

आणि अशा प्रदूषित नद्यांतील पाणी पिण्यासाठी वापरल्याने मानवाचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य जर उत्तम राहील तर मानवी आरोग्य सुदृढ राहील हे लक्षात घेतलं पाहिजे.

Beed River program
Painganga River : पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्यांना तत्त्वतः मंजुरी

गोदावरी, कृष्णा, भीमा, अशा मोठ्या नद्यांच्या यादीत मांजरा नदीचा समावेश होतो.

पण लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण जेव्हा कोरडे पडले आणि लातूर शहराला रेल्वेने पाणी आणावे लागले तेव्हा मांजरा नदी चर्चेत आली.

अशा मांजरा नदीचा उगम आपल्या जिल्ह्यात होऊन ती सातशेहून अधिक किलोमीटर वाहत जाते.

दरम्यान, शंभर मोठी शहरे आणि हजारो खेड्यांची तहान लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणत हा प्रवास ती करते.

तिला अमृत वाहिनी कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी हे चला जाणूया नदीला अभियान राबवण्यात येत आहे.

प्रास्ताविक लालासाहेब आगळे यांनी केले. समारोप कार्यक्रमात नदीचा गोंधळ सादर करून शाहीर सुधाकर देशमुख, राजू शेवाळे यांनी जनजागृती केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com