‘नैसर्गिक शेती’ योजनेतील गीरगायीची अट काढावी

पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन योजना आणली आहे. मात्र या योजनेतील गीरगायीची अट काढून टाकून त्याऐवजी खिलार गायीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी केली आहे.
Gir Cow
Gir CowAgrowon

निमगाव केतकी, जि. पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नैसर्गिक शेतीस (Natural Farming) प्रोत्साहन योजना आणली आहे. मात्र या योजनेतील गीरगायीची (Gir Cow) अट काढून टाकून त्याऐवजी खिलार गायीचा (Khilar Cow) पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी केली आहे.

Gir Cow
Crop Damage : ऑगस्टमध्ये १ लाख ३७ हजार हेक्टरवर पिकांना पावसाचा फटका

याबाबत श्री करे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेने केंद्र सरकारची नैसर्गिक शेती प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक गीरगाय, शेतकरी प्रशिक्षण, गांडूळ खतनिर्मिती, जैविक खतनिर्मिती, बायोडायनॅमिक निविष्ठा या करिता ६५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. आपल्या भागामध्ये देशी खिलार, माणदेशी काजळी खिलार या जाती आढळतात.

येथील वातावरणात त्या योग्य आहेत. असे असताना जिल्हा परिषदेने या योजनेतील गीरगायीची अट काढून टाकावी व त्या जागी देशी खिलार गाय घेण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी. यामुळे देशी खिलार जातीच्या गायीचे योग्य संगोपनदेखील होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com