Sugarcane Harvesting : ऊस तोडणी समस्येवर आज ‘डीएसटीए’ची परिषद

Sugarcane Season : देशातील ऊस उत्पादक राज्यांमध्ये ऊस तोडणी समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून यांत्रिक तोडणी वाढते आहे.
Sugarcane Harvester
Sugarcane HarvesterAgrowon

Pune News : देशातील ऊस उत्पादक राज्यांमध्ये ऊस तोडणी समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून यांत्रिक तोडणी वाढते आहे. मात्र, यांत्रिक तोडणीदेखील समस्या येत असून त्यावरील उपाय व यांत्रिकीकरणाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. १७) एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनकडून (डीएसटीए) पुणे कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होत असलेल्या या परिषदेला महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक व गोव्यातील साखर उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Sugarcane Harvester
Sugarcane Farming : पर्यायी पीक म्हणून उसाचा पर्याय योग्य

साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष शहाजीराव भड, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, कृषिरत्न डॉ. संजीव माने, माजी ऊस विशेषज्ञ व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, प्राचार्य डॉ. दशरथ ठवाळ, उगार शुगरचे डॉ. जगदीश कुलकर्णी आदी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या चार हंगामांपासून साखर कारखान्यांना तोडणी मजुरांच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे तोडणी वेळेवर होत नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. या समस्येवर यांत्रिकीकरण हाच उपाय असल्यामुळे ऊस तोडणी यंत्रांचा वापर वाढविण्याकडे कारखान्यांचा कल वाढत आहे.

डीएसटीएच्या म्हणण्यानुसार, तोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जातो तसेच पाचटापासून जमिनीत सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत आहे. मात्र, यंत्राच्या मदतीने तोडणी करतानाही काही समस्या येतात. त्यावरील उपाय व पुढील वाटचाल परिषदेत चर्चा केली जाईल.

Sugarcane Harvester
Sugarcane Factory: राजेश टोपे यांनी दिली साखर कारखान्याला भेट

परिषदेत चार राज्यांमधील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी तसेच ऊस तोडणी यंत्र निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होत आहे.

देशाच्या ऊसशेतीसाठी नावीन्यपूर्ण तोडणी यंत्रे विकसित केलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी परिषदेत आपली मते मांडणार आहेत. यात शक्तिमान, न्यू हॉलंड, एसबी रिसेलर या कंपन्या आपली तांत्रिक मते व्यक्त करणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने अवजारांचे प्रदर्शनदेखील होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com