Grape Farming : पावसाच्या अंदाजाबाबत द्राक्ष बागायतदारांत संभ्रम

गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे व शेतीमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडलेला आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

सांगली ः गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे (Natural calamity) व शेतीमालास योग्य बाजारभाव (Agriculture Produce Rate) न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात (Farmer In Economic Crisis) सापडलेला आहे. त्यातच राज्यातील हवामान तज्ज्ञ (Weather Expert) समजून काही जणांकडून हवामान अंदाजाविषयी (Weather Forecast) चुकीची व विसंगत माहिती सोशल मीडियाद्वारे दिली जात आहे.

Grape Export
Grapes Production : कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्षाचे खुडे सुरू

सध्या द्राक्ष बागांचा कालावधी आहे. परंतु काही जणांकडून पावसाबाबतचा पुढील चार महिन्यांचा चुकीचा अंदाज पसरवल्याने शेतकऱ्यांत संभमावस्था आहे. सध्या द्राक्ष बागांच्या फळ छाटण्या सुरू आहेत.

Grape Export
Grape Export : द्राक्ष निर्यातदार अडचणीत

सलग तीन वर्षे आर्थिक नुकसानीमुळे व सोशल मीडियाद्वारे देण्यात येणाऱ्या विसंगत हवामान अंदाजामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हवामानावर होत आहे. परंतु, मॉन्सून चार माहिने पुढे जाणे हे निश्चित नाही.

पूर्वीपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस कमी जास्त प्रमाणात होत आलेला आहे. तंत्रज्ञानामुळे पुढील काही तासांत काय होणार आहे हे कळते, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी घाबरून जाऊ नये. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीच्या धर्तीवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून पुढील ८ दिवसांचा हवामान अंदाज देण्यात येणार आहे.

सोशल मीडियावरून पाठवण्यात येणारे हवामान अंदाज विषयाची भीती न बाळगता वेळेवर ऑक्टोबर छाटणी घ्यावी. राज्य द्राक्ष बागायतदार संघ व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. कोणतीही भीती न बाळगता ऑक्टोबर छाटण्या कराव्यात.
चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ रिसर्च कमिटी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com