
Nagar APMC Election संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या शेतकरी विकास मंडळाची एकहाती सत्ता मिळाली आणि सर्व १८ जागांवर विजय मिळाल्याने थोरात यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.
राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व भाजपप्रणीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने जनसेवा पॅनेल उभा केला होता. या निवडणुकीत थोरात-विखे यांच्यात जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले.
निवडणुकीत मात्र मतदारांनी सर्व १८ जागा जिंकून देत थोरात यांचेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव हनुमंत खेमनर, कान्हेरे सुरेश रामचंद्र,
सतीश विश्वनाथ खताळ, गीताराम दशरथ गायकवाड, गोपाळे मनीष सूर्यभान, पानसरे कैलास बाळासाहेब, सातपुते विजय विठ्ठल, महिला राखीव मतदार संघातून दीपाली भाऊसाहेब वरपे व रुक्मिणी शिवाजी साकोरे, इतर मागासवर्गीय मतदार संघातून सुधाकर पुंजाजी ताजणे
, तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- अनिल शिवाजी घुगे, व्यापारी मतदारसंघातून भंडारी मनसुख शंकर व शेख निसार गुलाब, ग्रामपंचायत मतदार संघातून वाघ अरुण तुळशीराम,
शरमाळे सखाहारी बबन, खरात संजय दादा, कडलग नीलेश बबन, हे विजयी झाले आहेत. हमाल मापाडी मतदारसंघातून सचिन बाळकृष्ण करपे विजयी झाले. करपे अपक्ष असून त्यांनी लगेच थोरात यांना पाठिंबा दिला.
विजयी उमेदवाराचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे संजय फड, नामदेव कहांडळ उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.